Download App

‘राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुसाट; सुर्वे पहिले गुन्हेगार’

मुंबई : सत्ताधारी पक्षातर्फे विरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) माध्यमातून लक्ष केले जात आहे. जसे काय सत्ताधारी पक्षाचे नेते दुधाने अंघोळ करतात. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात भाजपची भूमिका काय होती? हे सर्व पुरावे समोर आलेले असताना ते फक्त बीजेपीच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले म्हणून त्यांना अभय आहे. आसामचे मुख्यमंत्री, नारायण राणे आज तुरुंगात असायला पाहिजे होते. पण आज त्यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे परिवार असेल, शिवसेना असेल किंवा आम्हा सर्व सहकाऱ्यांवर खोटो गुन्हे दाखल केले जात आहेत. संपत्तीचा विषय असेल किंवा व्हिडीओ मॉर्फींगचा (Video morphing) असेल फक्त शिवसेना, ठाकरे परिवार यांना लक्ष करणं या हेतूने राजकारण आणि प्रशासन काम करीत आहे. शेवटी लोकांना न्यायालयकडूनचं अपेक्षा आहे. या सगळ्या प्रकरणात ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा कट रचला गेला. त्याचे सुत्रधार आम्हाला माहिती आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

दिल्लीत आपचे दोन मंत्री, राज्यात मी, अनिल परब, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर प्रत्येकावर सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. खरंतर खोक्यावाल्या सरकारच्या संपत्तीचा हिशोब मागायला पाहिजे. पण ते आम्हाला हिशोब मागतात. तुम्ही आमच्यावर कितीही हल्ले करा पण आम्ही तुमचा प्रत्येक हल्ला परतावून लावू, असे संजय राऊत म्हणाले.

HSC Paper Leak Case : बारावीचा पेपर फोडणाऱ्या संस्थेच्या संचालकाला अखेर बेड्या

संजय राऊत पुढं म्हणाले, जागतिक पातळीवर जे युवा नेतृत्व आहे. जे विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत, फक्त राजकारण नाही. अशा 100 शक्तीशाली युवकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांचा समावेश झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा देखील जगातील शक्तीशाली लोकांमध्ये समावेश होता. आता आदित्य ठाकरे यांचा शक्तीशाली लोकांमध्ये समावेश होणं हा महाराष्ट्राचा आणि देशाचाही गैरव आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काल आपल्या देशात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. आपल्या देशातील सिनेमाल ऑस्कर मिळाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांची 100 शक्तीशाली युवा नेत्यांमध्ये समावेश झाला. गेल्या काही वर्षात आदित्य ठाकरे विविध क्षेत्रात एक मंत्री म्हणून आणि राजकीय नेते म्हणून ठसा उमठवला आहे. त्यांची ही निवड आंतरराष्ट्रीय पातळीवर दिलेली मान्यता आहे. आम्ही सर्वजण त्यासाठी आनंदी आहोत. आदित्य ठाकरे शिवसेना, महाराष्ट्र आणि देशाचं भविष्य आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Tags

follow us