मुंबई : ज्येष्ठ नाट्य समीक्षक (Drama critic) कमलाकर नाडकर्णी (Kamlakar Nadkarni) यांचं मुंबईतील गोरेगावच्या राहत्याघरी निधन झालं आहे. ते 88 वर्षाचे होते. ओशिवरा येथून साडेबारा एक वाजेपर्यंत अंत्ययात्रा निघेल असे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी कळवले आहे. दुपारी 1.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गेली 50 वर्षे ते नाट्य समीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी विविध वृत्तपत्रातून समीक्षक म्हणून लेखन केलं आहे. नाट्य समीक्षणाची आकर्षक शिर्षकं हे त्यांचं वैशिष्ट असायचं. 2019 मध्ये त्यांना नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
ईडीची 12 तास चौकशी अन् तेजस्वी यादवांची गर्भवती पत्नी बेशुद्ध
संगत, अपत्य, पस्तीस तेरा नव्वद, क क काळोखातला, रात्र थोडी सोंगे फार, चंद्र नभीचा ढळला अशा कितीतरी नाटकांसाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. कमलाकर नाडकर्णी यांना उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक ही पुस्तके लिहिली आहेत. एखाद्या कामगार पुढाऱ्यांच्या भाषणाप्रमाणे त्यांची नाट्य समिक्षा होती असे नाट्यक्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या वृत्तपत्रीय क्षेत्रात म्हटले जायचे. आपल्या धारदार लेखनीच्या जोरावर त्यांनी नाट्य समिक्षा वाचकाचा एक नेहमीचा हक्काचा वेगळा वाचक निर्मांण केला होता. यामुळेच नाट्य क्षेत्रात त्यांची जबाबदार नाट्य समिक्षकाची ओळख तयार झाली होती.