ईडीची 12 तास चौकशी अन् तेजस्वी यादवांची गर्भवती पत्नी बेशुद्ध
नवी दिल्ली : ईडीचा लँड फॉर जॉब (Land For Job)घोटाळाप्रकरणी तपास सुरु आहे. इडी अधिकाऱ्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांच्या तीन मुलींसह बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरीही छापा टाकला. इडीनं (ED)त्यांची 12 तास कसून चौकशी केली. त्यावेळी चौकशीदरम्यान तेजस्वी यादवांची गर्भवती पत्नी राजश्री यादव बेशुद्ध पडल्या. त्यांच्या पत्नीला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यानं बेशुद्ध पडल्याची माहिती आहे. त्यानंतर राजश्री यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून सलग 12 तास चौकशी केली. त्यादरम्यान तेजस्वी यादवांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवला. त्यामुळं त्या बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तीन वर्ष तुकाई बंद करण्याचं पाप केलं, राम शिंदेंनी रोहित पवारांना डिवचले
लालूप्रसाद यादव यांनी ईडीच्या छापेमारीची तुलाना आणीबाणीशी केली आहे. “आम्ही आणीबाणीचा तो काळा काळ पाहिला आहे. आम्ही ती लढाईही लढलो होतो. आज माझ्या मुली, थोटी नातवंडं, गर्भवती सून यांना भाजपाच्या ईडीने 15 तासांपासून बसवून ठेवलं आहे. भाजपा राजकीय लढाई लढण्यासाठी इतक्या खालच्या स्तराला आली आहे का? असा संताप लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला आहे.