मुंबई : शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे आधारवड म्हणून ओळखले जातात. पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे (Ajit Pawar) गेल्यानंतर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आता पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हासाठी तीन पर्याय देण्यात आले आहे. यात कपबशी, वडाचं झाडं आणि शिट्टी या चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आता पवारांना कोणतं चिन्ह मिळतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Sharad Pawar Group Give Three Symbols To EC )
काँग्रेसचे दलित कार्ड : विधान परिषदेला पराभूत झालेल्या चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी
अजित पवारांच्या बंडामुळे पवार गटात मोठी दुफळी तयार झाली आहे. यासर्वामध्ये निवडणुक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह हे अजित पवारांना दिले आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून पवारांना नवीन नाव आणि चिन्हबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पवार गटाकडून तीन नावांचा पर्याय देण्यात आला होता. त्यापैकी आयोगाने पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ हे नवीन नाव वापरण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता चिन्हांबाबत पवारांकडून तीन पर्याय आयोगाकडे पाठवण्यात आले आहेत.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार? बैठकीत गेलेल्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
वडाच्या झाडासाठी पवार गट आग्राही
पक्षाला निवीन नाव मिळाल्यानंतर आता चिन्हासाठी पवार गटाकडून तीन प्रस्ताव आयोगाला पाठवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने वडाचं झाड, कपबशी आणि शिट्टी या चिन्हांचा समावेश असून, शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादीचे आधारवड म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनेक नेते हे वडाच्या झाडासाठी आग्राही असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आयोगाकडून कोणत्या चिन्हावर शिक्कामोर्तब होतं हे पाहणे मह्त्त्वाचे ठरणार आहे.
अभिनयात हिरो पण, राजकारणात झिरो; सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा लोकसभेत ‘गपगार’
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होण्याच्या चर्चांनी खळबळ
एकीकडे सर्व पक्ष आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेसाठी तयारी करत असतानाच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांनी खळबळ उडाली आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनीच हा दावा केला आहे. शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील, असे बांदल म्हणाले.
द्रौपदी मुर्मूंच्या आधी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर; आंबेडकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
दरम्यान, बांदल यांचा हा दावा शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खोडून काढला आहे. आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे पवार साहेबांचं होतं आणि राहणार. त्यामुळे बाकी ज्या काही चर्चा सुरू आहेत. त्या चर्चांना काही अर्थ नाही. दुसऱ्या पक्षात विलीन होणे किंवा दुसऱ्या कोणत्या चिन्हावर लढणे असे काहीच होणार नसल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.