Download App

दादा भुसेंवर केलेले आरोप म्हणजे, अंधारात तीर मारण्याचा प्रयत्न; शीतल म्हात्रेंचा राऊतांवर घणाघात

  • Written By: Last Updated:

मुंबई : ससूनमधून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याच्या पलायनामागे मंत्री दादा भुसे यांचा हात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याबाबत नाना पटोलेंनी प्रथम भाष्य केलं. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी भुसेंचं नाव घेत चौकशीची मागणी केली. त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भुसेंचा ड्रग्ज माफियांशी काय कनेक्शन आहे, याची चौकशी करावी, अशी मागमी केली. दरम्यान, ठाकरे गटाकडून मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेले आरोप म्हणजे ‘अंधारा’त तीर मारण्याचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केलं.

महाराष्ट्राचा उडता पंजाब करू नका, ड्रग्ज प्रकरणावरून पटोलेंनी शिंदे सरकारला सुनावलं 

प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, ठाकरे गटाकडून मंत्री दादा भुसे यांच्यावर केलेले आरोप म्हणजे ‘अंधारा’त तीर मारण्याचा प्रयत्न आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना केलेले हे आरोप म्हणजे आकस बाळगून बदनामी करण्याचा कट असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

त्या म्हणाल्या, दादा भुसे हे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीतून तयार झालेले सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांना बदनाम करून त्यांना मुद्दाम चुकीच्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत चुकीचे असून स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, असे विश्वप्रवक्त्यांचे उद्योग आहेत, असा त्यांनी संजय राऊतांना लगावला.

संजय राऊतांना पत्रकार परिषद घेऊन दादा भुसे यांच्यावर 178 कोटींचा घोटाळा करून मालेगावमधील सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा बेछूट आरोप केला होता. याबाबत भुसे यांनी त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्याचा सुनावणीवेळी संजय राऊत यांनी कोर्टात हजर राहण्याचे टाळले, एवढेच नाही तर एकही लेखी पुरावा ते कोर्टासमोर सादर करू शकले नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्याना 23 ऑक्टोबर रोजी मालेगाव न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र याचा त्यांना विसर पडला आहे. उलट त्यांच्यावर ही नामुष्की ओढावल्याने आकस बाळगून त्यांनी दादा भुसे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटील याला मदत केल्याचे निराधार आरोप केल्याचं शीतल म्हात्रे यांनी सांगिलतं.

राऊतांचे हात हात खिचडी घोटाळ्यात बरबटलेले
संजय राऊत यांना स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोक्यातील कुसळ दिसते, असा आरोप म्हात्रे यांनी केला. सध्या सुरु असलेल्या खिचडी घोटाळ्याचा चौकशीमध्ये राऊतांचे कुटूंबीय तसेच त्यांच्या जवळच्या व्यक्ती गुंतलेल्या असल्याचे सिद्ध झालं. कोरोना काळात रुग्णांना 300 ग्राम खिचडी देण्याचे कंत्राट राऊतांटे निकटवर्तीय बाळा कदम यांना मिळालं होतं. मात्र त्यांनी ईडीकडे नोंदवलेल्या जबाबात 100 किलोची 1000 पाकीटे बनवून वितरित केल्याचे सांगितले आहे. म्हणजे 300 ऐवजी 100 ग्रॅम खिचडी रुग्णांना देण्यात आली असून त्यातून राऊत कुटूंबातील विदिशा राऊत ( संजय राऊत यांची मुलगी) हिला 12 लाख 75 हजार रुपये, संदीप राऊत ( संजय राऊत यांचे बंधू) यांना 6 लाख 25 हजार रुपये तर सुजित पाटकर ( संजय राऊत यांचे पार्टनर) यांना 41 लाख 80 हजार रुपये दिल्याचे आपल्या जबानीत सांगितले आहे. याबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी म्हात्रे यांनी केली.

बॉडी बॅग घोटाळ्यात किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप
कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या बॉडी बॅग्ज वेदांत इन्फोटेक याच कंपनीकडून 6 हजार 719 रुपयांना खरेदी करण्यासाठी उप-अधिष्ठाता राठोड यांना आपल्या घरी बोलवून तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी निर्देश दिल्याचे राठोड यांनी ईडीला दिलेल्या जबाबात सांगितलं असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. ही बॉडी बॅग ठाणे मनपाने 325 रुपयांना खरेदी केली होती. मग एवढ्या महाग बॉडी बॅग खरेदी करून मृतांच्या टाळूवरचे लोणी कुणी खाल्ले याचे उत्तर राऊतांनी द्यावं, अशी मागणी म्हात्रे यांनी केली.

लाईफलाईन घोटाळ्यातही राऊतांचे निकटवर्तीय लाभार्थी
कोरोना काळात मुंबईतील ज्या लाईफलाईन हॉस्पिटलला कोरोना केंद्र सुरू करण्याबाबत 19 मार्च 2020 साली ऑफर लेटर देण्यात आले. मात्र सुजित पाटकर यांनी केलेल्या पार्टनरशिप डिड ही 28 जून 2020 ही तारीख आहे. म्हणजे एखादी कंपनी सुरू होण्यापूर्वीच तिला काम देण्यात आले. त्याबदल्यात सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटे, कुणी आणली कुठून आणली यावर देखील संजय राऊत यांनी स्पष्टीकरण द्यावं, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.

Tags

follow us