मुंबई : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह (Hardeep Singh) यांनी तेल कंपन्यांना दर कमी करण्याचे आवाहन केले. याबरोबरच त्यांनी काही राज्यातील सरकारांवर निशाणा देखील साधला, म्हणाले की काही राज्य सरकारांनी वॅट कमी केला नसल्याने, त्या राज्यात इंधनाची (Fuel) किंमत अधिकी करण्यात आली. देशात काही कालावधीपासून (Petrol) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झाल्याचे दिसून आले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या विधानावरून शिवेसनेची (ठाकरे गट) मोदी सरकारवर (Modi government) निशाणा साधत आहे.
महागाई किंवा दरडोई उत्पन्नवाढ, शेतकरी असो की बेरोजगार, गरीब, मध्यमवर्गीय, आर्थिक धोरण, संरक्षणविषयक, गेल्या ८ वर्षांत देशात हवेत गोळीबार आणि जुमलेबाजी सुरू असल्याचे चित्र आहे. तेव्हा पेट्रोलियम मंत्री पुरी यांनीही इंधन दरकपातीची ‘पुंगी’ वाजवून जनतेला गुंगवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना तरी दोष का द्यावा ? या पुंगीवर जनता डोलणार नाही. कारण ही मोदी सरकारची ‘जुमलेबाजी’ आहे, हे जनता ओळखली आहे. इंधन दरवाढ आणि महागाई या दोन गोष्टी जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. याविषयी कोणी पतंगबाजी करू नका. नाहीतर जनता तुमच्या सरकारचा कधी ‘कटी पतंग’ करणार, हे देखील तुम्हाला समजणार नाही, असे सामनाच्या अग्रलेखाद्वारे देखील सांगण्यात आले आहे.
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह काय म्हणाले, काही राज्य सरकारांनी व्हॅट कमी केला नाही आणि तिथेही तेलाच्या किमती वाढत आहेत. हरदीप सिंग पुरी म्हणाले की, मी तेल कंपन्यांना विनंती करतो की जर आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती नियंत्रणात असतील, आणि त्यांच्या कंपन्यांची अंडर-रिकव्हरी थांबली असेल तर भारतातील तेलाच्या किमती कमी कराव्यात.