मुंबईत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी महापौर कोणाचा होणार याचा पेच अद्यापही कायम आहे, अशातच ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (BMC) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा महापौर हवा यापेक्षा भाजपचा महापौर होऊ नये असं अनेकांना वाटतं असल्याचं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. तर शिवसेनेचे नगरसेवक हे मूळचे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
कोंडलेल्या नगरसेवकांना संपर्क करण्याची अनेक साधन असतात, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे, देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो. काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहे. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत पण, पडद्यामागे अनेक घटना घडत आहेत, जे विजयाचे आकडे आहेत, ते समसमान आहेत, फक्त चारचा फरक आहे, इतका मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष जगातला सगळ्यात मोठा असलेल्या पक्षाला फक्त चार जागा जास्त मिळाल्या.
मुंबई महापालिकेत महापौर निवडीच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी
तुमचा बहुमत किती मोठा असू द्या किंवा छोटा असू द्या, बहुमत हे चंचल असतं, ते इथून तिथे, तिथून इथे कधीही सरकू शकतो, तुम्ही किती काळ नगरसेवकांना कोंडून ठेवणार, जे तुमच्या शिवसैनिक आहे. ते मूळचे शिवसेनेचे आहेत, त्यांच्या मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये देखील मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगते आहे, भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलं आहे, काय होतंय ते पाहू, त्यांना किती तुम्ही कोंडून ठेवलं तरी संपर्क आणि दळणवळणाची संदेश देण्याची, त्यानुसार संदेश येत असतात, संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
आम्हीही ताज हॉटेलमध्ये जेवायला जातो आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. काही नगरसेवक ताज लँड्स एंडमध्ये कोंडून ठेवलेले आहेत. बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती असेल. त्यांना मोकळा करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या, या मुंबईमध्ये स्वतःच्या, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलिस आयुक्तांना आदेश द्या, आज तिथे ताज लँड्स एंडमध्ये आम्ही जेवायला चाललो आहोत, नाहीतर ते आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी, असं म्हणत संजय राऊत यांनी मिश्किलपणे हसत एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना टोला लगावला आहे.
