Sanjay Raut criticized Devendra Fadnavis : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील वातावरण कधी नव्हे इतके अस्थिर, असुरक्षित, जातीपातींनी फाटलेलं आहे. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्र जातीजातीत फाटला गेला. हा महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत अनेकांचे कौशल्य होते. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रात जातीधर्मानुसार तुकड पडताहेत, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. खा. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार, मराठा आरक्षण, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.
अखेर शरद पवारांना पुण्यासाठी जिल्हाध्यक्ष मिळाला; अडचणीच्या काळात जुन्या सहकाऱ्यावर ‘विश्वास’
ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे वातावरण (Maharashtra Politics) पहिल्यांदाच इतके अस्थिर,असुरक्षित झाले आहे आणि याला भाजप (BJP) जबाबदार आहे. हेच फडणवीस आता बाहेरच्या राज्यात प्रचाराला चाललेत. त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊन हे बारामतीत जाऊन सांगितले होते. हेच देवेंद्र फडणवीस ज्यांनी आमच्या हातात सत्ता आली तर 24 तासांत मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देऊ म्हटलं होतं. मग का देत नाहीत, त्यामुळे जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. आता तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार?, आरक्षणाचे फुलबाजे यांनीच उडवल मग आता विझले का?, जरांगे पाटील यांनी समाजासाठी प्राण पणाला लावले आहेत. 16 तारखेच्या कॅबिनेट बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. त्यामुळे जरांगे यांनी गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) उपोषण करत आहेत. यावरही राऊत यांनी पुन्हा एकदा भाष्य करत सरकारवर गंभीर आरोप केला. या सरकारला मराठा आरक्षणावर काहीच करायचं नाही. हे सरकार घाबरट आहे. सरकार फक्त आश्वासन देतं. या सरकारला मनोज जरांगेंना (Manoj jarange) संपवायचं आहे. त्यांना काहीही काळजी नाही, असा आरोप राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
Video : आरक्षणाबाबत सरकार गंभीर ते बोलून मोकळं व्हायचं: सरकारच्या मनात नेमकं काय?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये को-ऑर्डिनेशन कमिटीची बैठक आहे. तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. कारण, अभिषेक बॅनर्जींना आजच ईडीचा समन्स आला आहे. ही बदल्याची कारवाई आहे. अभिषेक बॅनर्जीवर सूडबुद्धीने राजकारण केले जाते आहे. आमच्या कमिटीमधील हेमंत सोरेन, अभिषेक बॅनर्जी आणि माझ्यावर सुद्धा दबाव आहे, पण काही झालं तरी या दबावाला झुकायचे नाही. लोकसभेच्या जागा वाटपात कुठलीही अडचण येणार नाही, असा दावा राऊत (Sanjay Raut) यांनी केला.