Video : आरक्षणाबाबत सरकार गंभीर ते बोलून मोकळं व्हायचं: सरकारच्या मनात नेमकं काय?
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर, तीन जीआरदेखील काढण्यात आले. मात्र, जरांगे पाटलांनी सरकराचे सर्व जीआर लाथाडून लावले. उपोषणाच्या सुरूवातीपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, नुकताच व्हायर झालेल्या व्हिडिओमुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे सरकार या आरक्षणासाठी गंभीर आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (CM Eknath Shinde Video Viral On Maratha Reservation)
…तर संभाजी भिडेंच्या कृत्याचं खापर देवेंद्र फडणवीसांच्या वाट्याला जाईल, जयंत पाटलांचा टोला
आतापर्यंत सरकार काय काय म्हणाले?
मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर असल्याचे आणि ते देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एकनाथ शिंदेंनी वेळोवेळी सांगितले आहे. तसेच मध्यंतरी पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचा दाखला देण्याची घोषणा केली. तसेच यासाठी आवश्यक कार्यपद्धती आणि पडताळणीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकाराचीदेखील इच्छा आहे. परंतु, ते देताना हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचेही शिंदेंनी सांगितले होते. मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करणे गरजेचे आहे. त्यावर काम केले जात असल्याचेही शिंदे म्हणाले होते.
Maratha Reservation : जरांगेंना CM शिंदेंचा फोन; दोघांत काय झाली चर्चा ?
आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूने असून, ते देताना कुणाचीही फसवणूक करू शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही हेदेखील महत्त्वाचे आहे. ओबीसींना मिळणारे लाभ आपण मराठ्या देत असून, शासन कोणालाही फसवू इच्छित नाही असे शिंदेंनी स्पष्ट केले होते.
आरक्षणाबाबत सरकार गंभीर ते बोलून मोकळं व्हायचं…
वरील सर्व घडामोडीं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर सरकार खरचं या आरक्षणाबाबत गंभीर असल्याचे वाटत होते. मात्र, यातच मुख्यमंत्री एकनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे.
Manoj Jarange : पाच अटी अन् 12 ऑक्टोबरला विराट सभा; जरांगे पाटील काय म्हणाले?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.” असे बोलत असल्याचे दिसून येत आहे. शिंदेंच्या या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी – “हो……येस’ असे म्हणत असल्याचे ऐकू येत आहे. या दोघांच्या संवादावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया न देता दोघांनाही “माईक चालू आहे.” असल्याचे सांगताना दिसून येत आहे. शिंदे सरकारमधील तिन्ही नेत्यांचा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओनंतर अनेक स्तरातून टीकेची झोड उठवली जात असून, विरोधकांकडूनही यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
अजित पवार काळजी करणारे तर, फडणवीस लुच्चेपणा करणार नाही
एकीकडे सरकार मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असताना संभाजी भिडे यांनी काल (दि.12) जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंच्या लढ्याला 100 टक्के यश मिळेल असे म्हणत त्यांचे उपोषण योग्य आणि सुत्य असल्याचे म्हटले. तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
मी देखील वाभाडे काढायला कमी पडणार नाही, जळगावच्या सभेतून अजित पवारांचा इशारा
भिडे म्हणाले की. सरकारमधील तिनही नेते म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार धुरंधर आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाही. तर, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जरी राष्ट्रवादीचे असले तरी, ते काळजी करणारे आहेत. त्यामुळे तुमच्या लढ्याला नक्कीच यश येईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आता तिन्ही नेत्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खरचं हे सरकारच्या मनात मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव… pic.twitter.com/172MQ4cxXH
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) September 12, 2023