Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drugs Case) विरोधी नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याच्या आणखीही काही साथीदारांना अटक करण्यात आली. तरी देखील विरोधकांची टीकेची धार कमी झालेली नाही. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मंत्री दादा भुसे आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. काल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट नाशकात जाऊन ड्रग्जविरोधातील मोर्चात सहभाग घेतला. त्यानंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केले.
संजय राऊतांनाच बेड्या ठोका, त्यांनीच ललित पाटीलला.. शिंदे गटाचा नेता भडकला
राऊत म्हणाले, ज्या व्यक्तींनी ललित पाटीलचे पालनपोषण केल आणि त्याला मातोश्रीवर आणले ते नाशिकचे दादा भुसे, अजय बोरस्ते आहेत. त्यावेळी अजय बोरस्ते नाशिकचे शहरप्रमुख होते. हे दोघेही आता सत्ताधारी पक्षात आहेत. राज्याचे गृहमंत्री 2020 मध्ये ललित पाटील नाशिकचा महानगरप्रमुख होता असा दावा करत असतील तर 1991-92 मध्ये मुंबईत दंगली झाल्या तेव्हा दाऊद इब्राहिम तुमच्या पक्षाचा अध्यक्ष होता आणि छोटा शकील भाजपाचा जनरल सेक्रेटरी होता अशा शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
तुम्ही कसले गृहमंत्री ?
फडणवीसांना उद्देशून राऊत म्हणाले, तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात तेव्हा माहिती घेऊन बोला. तपास करा. ड्रग्ज माफियांकडून भाजपाला हप्ता मिळतोय. आम्ही काल मोठा मोर्चा काढला. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. लोक रस्त्यावर उतरले होते. कारण, ड्रग्ज त्यांच्या घरात शिरलंय. ड्रग्जमुळे नाशिकसारखं शहर खराब झालं. गुजरात राज्यातून नाशिक शहरात ड्रग्ज येत आहे. त्यावर आधी बोला. तुम्ही कसले मंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहात, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली.
“माझ्यासमोर एक अन् कोर्टासमोर वेगळीच भूमिका” : ठाकरे गटावर राहुल नार्वेकरांची नाराजी