संजय राऊतांनाच बेड्या ठोका, त्यांनीच ललित पाटीलला.. शिंदे गटाचा नेता भडकला
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drugs Case) विरोधी नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याच्या आणखीही काही साथीदारांना अटक करण्यात आली. तरी देखील विरोधकांची टीकेची धार कमी झालेली नाही. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मंत्री दादा भुसे आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काल खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट नाशकात जाऊन ड्रग्जविरोधातील मोर्चात सहभाग घेतला. राज्य सरकारवर पु्न्हा घणाघाती टीका केली. यानंतर आता शिंदे गटातील नेतेही आक्रमक झाले असून त्यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी तर थेट संजय राऊत यांना बेड्या ठोकण्याची मागणी केली आहे.
कंत्राटी भरती GR बाबत वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा; अजितदादाही टार्गेट
उद्धव ठाकरे यांनी ललित पाटीलच्या हातावर शिवबंधन बांधले होते. त्याला शहरप्रमुखही केले होते. त्याआधी त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. हे माहिती असतानाही त्याला पक्षात घेण्यात आले. ललित पाटील मुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्धवस्त झाले. उद्धव ठाकरे यांना हे माहिती नव्हते का, असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.
ललित पाटीलला पक्षाची कवचकुंडलं कुणी दिली ?
ललित पाटीलचे धागेदोरे संजय राऊत यांच्यापर्यंत आहेत की नाही याचा तपास केला पाहिजे. कारण याच ललित पाटीलला उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून नाशिक शहराचा प्रमुख केला होता. आता संजय राऊत आंदोलनाची भाषा करत आहेत. खरं तर संजय राऊतांनाच बेड्या ठोकायला पाहिजेत. कारण त्यांनी त्याला शहरप्रमुख केलं. पक्षाचं कवचकुंडल ललित पाटीलला कुणी दिली असा सवाल उपस्थित करत जर त्याला ही कवचकुंडलं दिली नसती तर त्याने हा धंदा केलाच नसता असेही गायकवाड यांनी सांगितले.
Ajit Pawar : पहाटे पाहणी दौरा का करता? पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
राऊतांची जहरी टीका
ठाकरे गटाने काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढला. यावेळी संजय राऊत यांनी सत्तेत असलेल्यांवर जोरदार टीका केली. ललित पाटील यांच्या मैत्रिणी विधानसभेपर्यंत आहे. आणि येथून त्यांना हप्ते दिले जातात. सत्तेत बसलेल्या आमदारांचा या प्रकरणात सहभाग आहे. यामध्ये सहा आमदार सहभागी असून प्रत्येकाला 16 लाखांचा हप्ता मिळतो.मात्र, फडणवीस हे त्यांना पाठीशी घालताहेत. फडणवीस भांग पित नसतील, पण त्यांना वासानेच नशा येते, अशी टीका त्यांनी केली.