Download App

Sanjay Raut : ‘मुश्रीफ, अजितदादा अन् भुजबळ ‘महादेव अ‍ॅप’ मेंबर’; राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : सध्या देशभरात महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप (Mahadev Betting App) चर्चेत आहे. या अ‍ॅपवरून छत्तीसगड राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Chhattisgarh Election) आहेत नेमक्या ह्याच वेळी हा मुद्दा पुढे आला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांना महादेव अ‍ॅपच्या प्रवर्तकांकडून तब्बल 508 कोटी रुपये मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. छत्तीसगडमधील या राजकीय गदारोळाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. याच मुद्द्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ हे सुद्धा महादेव अ‍ॅपचे मेंबर आहेत, असा धक्कादायक आरोप राऊत यांनी केला.

Girish Mahajan : संजय राऊतांच्या डोक्याचा इलाज करा; ‘त्या’ वक्तव्यावर महाजनांचा खोचक टोला

खासदार राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक, महादेव अ‍ॅप मुद्द्यावर सत्ताधारी गटावर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले, महादेव ॲपमध्ये भूपेश बघेल अडकले आणि जर ते आता भाजपमध्ये गेले तर त्यांचा हर हर महादेव होईल. हसन मुश्रीफ, अजित पवार आणि छगन भुजबळ हे सुद्धा महादेव ॲप मेंबर आहेत. जेलमध्ये पाठवायचं होतं त्यांची आता पूजा केली जात आहे.  तुम्ही या लोकांना तुरुंगात डांबणार होतात. परंतु, आज मात्र त्यांची पूजा केली जात आहे. पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीस पवार-मुश्रीफ-भुजबळांवर फुलं उधळत आहेत. गोंदियामध्ये तुम्ही बघितलं असेल प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचं स्वागत केलं. इकबाल मिरचीसोबत संबंध असल्याचा आरोप प्रफुल पटेलांवर यांनीच केला होता. आता तेच हातात हात घालून चालत होते ही सगळी महादेव अॅपचीच कमाल आहे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

राऊतांनी सांगितला लालूंचा किस्सा 

लालूप्रसाद यादव एकदा म्हणाले होते, मी जर भाजपात गेलो असतो तर एव्हाना मी राजा हरिश्चंद्राचा अवतार झालो असतो. सत्यवादी झालो असतो. पण, मी भाजपात गेलो नाही. मी त्यांच्यासमोर गुडघे टेकले नाहीत म्हणून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कारवाई सुरू आहे. महादेव अॅपचंही तसंच आहे.

महादेव बेटिंग अ‍ॅपसह 22 अ‍ॅपवर बंदी, ईडीच्या निवेदनानंतर केंद्र सरकारचा झटका

महादेव अ‍ॅपवर सरकारने घातली बंदी 

ऑनलाइन बेटिंग आणि जुगार अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचं आमिष दाखवलं जात. त्याला भुलून अनेकजण पैसे लावतात. यात अनेकांची घरे उद्ध्वस्त होतात. महादेव बेटिंग अ‍ॅ (Mahadev Betting App) प्रकरणी सातत्याने तक्रारी येत असतांना त्यावर सरकारकडून कुठहीही कारवाई होत नव्हती. अखेर काल केंद्र सरकारने (Central Govt) महादेव बेटिंग अ‍ॅपसह आणखी 22 बेटिंग आणि जुगार अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

Tags

follow us