महादेव बेटिंग अॅपसह 22 अॅपवर बंदी, ईडीच्या निवेदनानंतर केंद्र सरकारचा झटका
Ban 22 illegal betting apps : ऑनलाइन बेटिंग आणि जुगार अॅपच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचं आमिष दाखवलं जात. त्याला भुलून अनेकजण पैसे लावतात. यात अनेकांची घरे उद्ध्वस्त होतात. महादेव बेटिंग अॅप (Mahadev Betting App) प्रकरणी सातत्याने तक्रारी येत असतांना त्यावर सरकारकडून कुठहीही कारवाई होत नव्हती. अखेर आज केंद्र सरकारने (Central Govt) महादेव बेटिंग अॅपसह आणखी 22 बेटिंग आणि जुगार अॅप्सवर बंदी घातली आहे.
“शरद पवारांनी ‘त्यावेळी’ रातोरात मराठ्यांचं आरक्षण घालवलं” : नामदेव जाधव यांचा थेट आरोप
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. महादेव अॅपच्या माध्यमातून बेकायदेशीर बेटिंग होत असल्याचे सांगत ईडीने केंद्र सरकारला या अॅपवर बंदी घालण्याबाबत निवेदन केलं होतं. त्यानंतर सरकारने बेटिंग अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 22 अॅप्स आणि वेबसाइट्सवर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणाले, छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत वेबसाइट/अॅप बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार होता. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. त्यानंतर ईडीकडून निवदेन आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
महादेव अॅप हे ऑनलाइन बेटिंग अॅप आहे. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या मालकीचे आहे. ईडीने सप्टेंबरमध्ये महादेव अॅपची चौकशी सुरू केली. त्यावेळी ईडीने कोलकाता, भोपाळ, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये छापे टाकून सुमारे 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
त्यानंतर काल ईडीने महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ईडीने पाचशे आठ कोटी रुपये दिल्याचा दावा केला. महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून निवडणुकीसाठी पैसे पाठवले जात असल्याची माहिती मिळाल्याचे आधारे ईडीने असीम दासला अटक केली. त्यानंतर ईडीने महादेव अॅपवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे निवदेन दिलं होतं. त्यामुळं सरकारने 22 अॅपवर बंदी घातली.