Download App

‘आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पप्पांना प्रश्न विचारावा’; खा. शिंदेंचा खोचक टोला

Mumbai News : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर भाष्य करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. एकीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री मात्र हेलिकॉप्टर घेऊन शेतात जातात, अशी टीका ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सत्तेत असताना ते अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेले. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पप्पांन अडीच दिवसांत कशा प्रकारे सरकार चालवले, असा प्रश्न विचारला पाहिजे अशा खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले. कोकणातील गणेशोत्सवासाठी शिवसेनेकडून मोफत एसटी बस सोडण्यात आल्या. या कार्यक्रमानिमित्त खा. शिंदे डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘इतकं क्रूर सरकार अन् राजकारण आम्ही पाहिलं नाही’; मणिपूरवरून राऊतांची पुन्हा आगपाखड

काल छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 60 हजारांपेक्षा जास्त रुपयांचे पॅकेज मराठवाड्यासाठी जाहीर करण्यात आलं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी विविध निर्णय घेतले. गेल्या सव्वा वर्षात एनडीआरएफचटे नियम बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं. साडेबारा हजार कोटींपेक्षा जास्त निधी शेतकऱ्यांना दिला. लोकांना टीका नको तर कामं हवी आहेत. तळागाळातील व्यक्तीला न्याय देण्यासाठी सरकार काम करत आहे, असेही खासदार शिंदें म्हणाले. मला वाटतं आता त्यांनी बाहेर पडायला पाहिजे. ज्यांनी टीका केली, त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन लोकांना भेटले पाहिजे. ते आतापर्यंत लोकांना भेटले नाहीत. आता तरी जाऊन भेटावे. त्यामुळे मागचे सरकार आणि आताच्या सरकारमधील फरक जाणवेल. लोकांना जाऊन विचारत नाहीत तोपर्यंत त्यांना काहीही कळणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

Tags

follow us