Maharashtra Politics : ‘मजा येईल.., ‘राज्यपाल पदासाठी राणेंच्या नावावर राऊतांचं बोलकं विधान

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार २०१९ पासून ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsinh Koshyari) यांच्यात विळ्या भोपळ्याचं नातं असल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या ६ महिन्यात ठाकरे सरकार कोसळल्यावर राज्यात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात कायम वाद चालूच असल्याचं दिसत […]

Untitled Design (90)

Sanjay Raut

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार २०१९ पासून ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsinh Koshyari) यांच्यात विळ्या भोपळ्याचं नातं असल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या ६ महिन्यात ठाकरे सरकार कोसळल्यावर राज्यात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात कायम वाद चालूच असल्याचं दिसत आहे. राज्यपालांनी काही ऐतिहासिक व्यक्तींविषयी केलेल्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना पदावरून दूर केलं जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्याजागी कोण येणार ? यावर चर्चा होत आहे.

यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आधी ही शक्यता फेटाळून लावली. नियम आणि कायदा पाहिला, तर त्या राज्याचा नागरिक हा त्या राज्याचा राज्यपाल होऊ शकत नाही. पण या देशात अनेक घटनाबाह्य गोष्टी होत असतात. असं काही घटनाबाह्य कृत्य होत असेल, तर आम्ही त्या नावाचं स्वागत करू. मजा येईल, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्राचे भावी राज्यपाल म्हणून अनेक नावं चर्चेत असली, तरी नारायण राणे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले तर काय होणार, अशी विचारणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना केली असता, त्यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर संजय राऊतांनी शेवटी फक्त दोन शब्दांत “मजा येईल” असं म्हटलं. त्यामागे शिवसेना विरुद्ध नारायण राणे या वादाची दीर्घ पार्श्वभूमी असल्याचंच त्या दोन शब्दांत दिसून आल्याचं बोललं जात आहे.

देशपातळीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याजागी कुणाची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून वर्णी लागणार ? याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: केंद्र सरकारला आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. महाराष्ट्रात परत बोलावण्याची इच्छा राज्यपालांनी व्यक्त केल्याच्या मुद्द्याला खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला. या पार्श्वभूमीवर लवकरच महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता निर्माण झाली.

Exit mobile version