अजित पवार अन् शरद पवार दिलजमाईत कुणाचा खोडा? राऊतांनी घेतली ‘या’ दोन नेत्यांची नावं

दोन्ही पक्ष एकत्र येण्यात काय राजकारण आहे याचा खुलासा आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

Sanjay Raut

Sanjay Raut

Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, अजून तरी दोन्ही गटात दिलजमाई झालेली नाही. दोन्ही पक्ष एकत्र येण्यात काय राजकारण आहे याचा खुलासा आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यात त्यांनी अजित पवार गटातील दोन नेत्यांची नावं घेतल्याने त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राऊत पुढे म्हणाले, याच्यात विरोधाभास कसा आहे बघा, आजही ते (अजित पवार) शरद पवार आमचे नेते आहेत सांगतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत हे सांगतात, एकत्र आले पाहिजे सांगतात, आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा एकत्र येत नाहीत, याचा अर्थ मोदींच्या मुख्य दुकानासोबत त्यांना आपले छोटे दुकान चालवायचे आहे. प्रफुल्ल पटेल महान नेते नाहीत. तटकरे आता अध्यक्ष आहेत. उद्या हा पक्ष विलीन होणार नाही अशी माझी माहिती आहे. पण झाला तर तटकरेंनी काय करायचे, केंद्रातील मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येक जण आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो.

Sanjay Raut : वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नव्हता ना? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे तर बडे नेते प्रफुल्ल पटेल आहेत. यांच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत नाहीत. या दोघांच्या विरोधामुळेच हे दोन्ही गट एकत्र येत नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी कालही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर वक्तव्य केले होते. त्याचे जोरदार पडसाद उमटले. तहान लागली असली तरी गटारीचे पाणी कुणी पित नाही अशी टीका त्यांनी केली होती. सु्प्रिया सुळेंचं नाव वारंवार घेण्यात येते किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेण्यात येतात. त्यांना तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर गटाराचं गढूळ पाणी कुणी पित नाही असा टोला राऊतांनी लगावला होता.

महिला आयोगाचा अध्यक्ष अराजकीय करा

महिला आयोगावर अराजकीय सदस्य असायला हवेत. तिकडे राजकीय नेत्याच्या जवळच्या महिला नेत्याची नियुक्ती केली जाते कारण त्याला कॅबिनेट दर्जा आहे. मात्र राज्य महिला आयोग असेल किंवा केंद्रीय महिला आयोग असेल तिकडे अराजकीय महिलांनाच अध्यक्ष आणि सदस्य नेमायला हवे असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

आता ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषिमंत्री कोकाटेंच्या वक्तव्याची तुफान चर्चा

Exit mobile version