Download App

‘शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक घोटाळा’; संजय राऊतांचा घणाघात

शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

Shivsena UBT MP Sanjay Raut Press Conference : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं (Shikhar Bank Scam) शिखर बँक घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. अजित पवारांना (Ajit Pawar) शिखर बँक घोटाळ्यात दिलेल्या ‘क्लीन चिट’ला नव्यानं आव्हान देण्यात आलं आहे. अजित पवारांविरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर 25 जुलैला सुनावणी होणार आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली आहे. शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे, अशी टीका राऊत यांनी केली. खटला चालवताना जो खर्च झाला तो कुणाच्या खिशातून घेणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांच्या अडचणी वाढणार; शिखर बँक घोटाळ्यात दिलेल्या ‘क्लीनचीट’ला नव्यानं आव्हान

राऊत पुढे म्हणाले,  शिखर बँकेसंदर्भात क्लीन चीट मिळणं हाच एक सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अशा पद्धतीने हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत खटले चालवायचे. त्यासाठी लाखो कोट्यावधी रुपये सरकारच्या खात्यातून पैसे काढून खटले चालवायचे. आणि मग त्या आरोपीने पक्षात आला की त्याच्याबद्दल पुन्हा चांगले बोलायचे. खटला चालवताना जो काही खर्च होतो तो कोणाच्या खिशातून घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या का? असा खोचक सवाल त्यांनी केला.

फुटीरांवर काँग्रेस नक्कीच कारवाई करील

विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालं हे काँग्रेसने मान्य केलं आहे. आम्हालाही तो अनुभव आला. त्यांना फार मोठ्या रकमा आणि जमिनीचे तुकडे दिले. मतदानाला जाण्यापूर्वीच त्यांना हे देणार असल्याचे मंजूर केले होते. अशा पद्धतीने आमदारांना पैसे देऊन मत फोडणे ही संविधानाची हत्या नाही का ? सरकार बेकायदेशीर आहे आमदार अपात्र करू शकतात त्याच पद्धतीच्या आमदारांना अशा पद्धतीने फोडणे चुकीचे आहे. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव घडवून आणला होता. आता काँग्रेस पक्षाकडून नक्कीच आमदारांवर कारवाई होईल. कारण काँग्रेसचे काम करण्याची एक पद्धत आहे त्यानुसार ते कारवाई करतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

“..तर विधानसभा लढणार नाही, महायुतीला जागा देणार”; आमदार बच्चू कडूंची मोठी घोषणा

2024 मध्ये मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतात नाचत आहेत त्यांनी आपले मानसिक स्वास्थ ठीक आहे का? याची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यांचे कुटुंब आणि नेत्यांना मानसिक तपासणीचे आवाहन मी करतो. नरेंद्र मोदी यांचा (PM Narendra Modi) पराभव झाला आहे आता त्यांच्याकडे बहुमत नाही. कुबड्यांवरचं हे सरकार आहे. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि नितीशकुमार यांना (Nitish Kumar) देवाने सुबुद्धी दिली तर त्यांचे सरकार कधीही कोसळेल. जे म्हणतात मोदी जिंकले त्यांच्या बडबडण्यावर मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

follow us