रतन इंडिया ग्रुपने भारतात पहिल्यांदा इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली आहे. रिवोल्ट (Revolt) नावाने ही बाईक आहे. या बाईकची डिलरशीप सोहम ग्रुपकडे आहे. पुण्यानंतर मुंबईतील अंधेरीत सोहम ग्रुपने रिवोल्टचे शोरुम सुरू केले आहे. आणखी काही शहरांत लवकरच शोरुम सुरू करून महाराष्ट्र काबीज करू, असा विश्वासही सोहम ग्रुपचे चेअरमन नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.
रतन इंडिया ग्रुपचे चेअरमन राजीव रतन, बिझनेस चेअरपर्सन अंजली रतन यांच्या हस्ते कंपनीच्या शोरुमचे उद्घाटन झाले. यावेळी अभिनेता स्वप्नील जोशी, एसएस मोबाइलचे चेअरमन सिद्धार्थ शाह उपस्थित होते. यावेळी ग्राहकांना बाईक वाटपही करण्यात आले.
रतन इंडिया ग्रुपचे चेअरमन राजीव रतन म्हणाले, देशात या बाईकची विक्री वाढत आहे. चांगली सेवाही दिली जात आहे. रिवोल्ट हे बाईक मार्केटमधील मोठे नाव आहे. हे सुपर प्रोडेक्ट असून, भविष्य आहे.
रिवोल्ट बाईकची चार वर्षांत जोरदार विक्री झाली आहे. पुढे भविष्यात चार वर्षांत आम्ही बाईक मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर राहणार आहोत. सोहम ग्रुपमार्फत सर्वाधिक बाईकची विक्री केली जाईल, असा विश्वास अंजली रतन यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी, नाशिक, कोल्हापुरला लवकरच शोरुम-नरेंद्र फिरोदिया
रिवोल्ट ही देशात सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. या बाईकचे पुण्यात शोरुम आहे. आता मुंबईत शोरुम सुरू झाले आहे. त्यानंतर डोंबिवली येथे शोरूम सुरू होईल. पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, येथेही शो रुम सुरू करणार आहे. बाईक विक्रीत महाराष्ट्र काबीज करू, असे सोहम ग्रुपचे चेअरमन नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले.
अभिनेता स्वप्नील जोशी बाईक पाहताच भारावला !
रिवोल्टची बाईक खूपच भारी आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर विश्वासच बसत नाही की ही इलेक्ट्रिक बाईक आहे. आंतरराष्ट्रीय स्पोटर्स बाईक सारखा लूक आहे. आजची भाषा बोलणारी, सध्याच्या पिढीला साद घालणारी ही बाईक आहे. बघताच क्षणी बाईक घेऊन घरी चालवत जावे असे वाटते, अशी प्रतिक्रिया अभिनेता स्वप्नील जोशी याची होती.
संपूर्ण भारतीय बनावटीची बाईक
रिवोल्ट ही संपूर्ण भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक बाईक आहे. एक वेळ चार्जिंग झाल्यावर १८० किलोमीटर ती धावू शकते. महिन्याचा खर्च केवळ चारशे रुपये इतका आहे.
आतापर्यंत मार्केटमध्ये ई स्कूटर या व्हर्जन मध्ये अनेक कंपन्या दाखल झाल्या. पण तरुणाना आकर्षित करेल या बाईक प्रकारात रिवोल्टने प्रवेश केला. केवळ प्रवेश नाही तर देशात विक्रीमध्ये पाहिला क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत तुम्ही इलेक्ट्रिक गाड्याचा आवाजा येत नाही. पण रिवोल्टने जी बाईक आणली ही बाईक स्पोर्ट बाईकप्रमाणे स्पीडचा आवाज येतो. त्यामुळे आपण स्पोर्ट बाईक चालवत आहोत, असाच फिल अनुभवता येतो. या प्रकारामुळे या बाईककडे तरुण आकर्षित होत आहेत.