Download App

अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, ट्रकला धडकली कार; अभिनेत्याने सांगितलं काय घडलं?

अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद मुंबई-नागपूर महामार्गावरील अपघातात जखमी झाली आहे.

Sonali Sood Accident : अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) पत्नी सोनाली सूद मुंबई-नागपूर महामार्गावरील अपघातात जखमी झाली आहे. सोमवारी हा अपघात झाला होता. परंतु, या अपघाताची माहिती आता समोर आली आहे. परंतु, यात काळजी करण्यासारखं काही नाही असे सांगितले जात आहे. सोमवारी नागपुरात हा अपघात झाला होता. कारमध्ये सोनाली सूद, तिची बहीण आणि आणखी एक महिला होती. कार एका ट्रकला धडकली. सुदैवाने यात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या सोनाली सूद नागपुरात असून येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. सोनू सूद आज सकाळीच नागपुरात दाखल झाला.

या घटनेनंतर सोनू सूद म्हणाला आता सोनाली ठीक आहे. सुदैवाने या अपघातातून ती बचावली. सोनू सूद आणि सोनाली या दोघांचं लग्न 1996 मध्ये झालं होतं. सोनाली मूळची आंध्र प्रदेशातील आहे. चित्रपट निर्माता म्हणून कार्यरत आहे. सोनू सुदचा चित्रपट फतेहमध्ये निर्माता म्हणून सोनालीने जबाबदारी सांभाळली होती. सोनू आणि सोनाली या दाम्पत्याला अयान आणि इशांत अशी दोन मुलं आहेत.

Sonu Sood: 10 वर्षाच्या मुलाच स्वप्न साकार करण्यासाठी सोनू सूद ठरला देवदूत, म्हणाला 

सोनू सूद फतेह या चित्रपटात दिसला होता. डायरेक्टर म्हणून देखील सोनू सूदने या चित्रपटातून डेब्यू केला होता. चित्रपटाची कथा आणि संवाद देखील सोनूनेच लिहीले आहेत. चित्रपट बॉक्स ऑफीसवर मात्र अपयशी ठरला होता. कोरोना काळात सोनू सूदने उल्लेखनीय काम केलं होतं. 2020 मधील लॉकडाउनच्या काळात प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात सोनूने मोठी मदत केली होती. विदेशात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा भारतात आणण्यासाठी सुद्धा सोनूने प्रयत्न केले होते.

 

follow us