Download App

मोठी बातमी ! मविआच्या काळात फडणवीस, एकनाथ शिंदें यांना अडकवण्याचा कट? तपासासाठी एसआयटी गठीत

सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहविभागाने काढलाय.

  • Written By: Last Updated:

special investigation team (SIT) to probe an alleged conspiracy to frame CM Devendra Fadnavis, Deputy CM Eknath Shinde: महाविकास आघाडीच्या काळात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Deputy CM Eknath Shinde) खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचल्याचा आरोप विधानपरिषदेत आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला होता. दरेकर यांनी या संबंधाची ऑडिओ क्लीप नागपूर अधिवेशनात सादर केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी दरेकर यांनी केली होती. त्यानंतर एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय झाला आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे असलेल्या गृहविभागाने काढलाय.

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ

कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक राजीव जैन, मुंबईचे पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे, मुंबई शहराचे सहायक पोलीस आयुक्त आदिकराव पोळ हेही पथकात आहेत. या पथकाने तीस दिवसांत तपास करून त्याचा अहवाल सरकारला सादर करायचा आहे. गृहविभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे नेते व तत्कालीन पोलिस अधिकारी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोध धोडींचा मृतदेह कारच्या डिक्कीत सापडला, सर्वत्र खळबळ…

काय आहे प्रकरण?
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी गेल्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये पाँइट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे एक प्रश्न विचारला होता. तत्कालीन सरकारच्या आदेशानुसार तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचे षडयंत्र रचले होते, असा आरोप दरेकर यांनी केला होता. त्याची एक ऑडिओ क्लीप होती. फडणवीस व शिंदे यांना अडकवा. डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांना ती जबाबदारी दिली होती. संजय पुनामिया यांचा जबाब वाचून दाखवतो. सदर आरोपीने एसीपी सरदार पाटील यांना विचारणा केली. तुम्ही टार्गेट नव्हता. तर, शिंदे व फडणवीस हे टार्गेट होते. हे व्हिडिओ समोर आले आहेत. सूड भावनेने सरकारने वागू नये असे सांगताना महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे यांचे वर्चस्व वाढत होते म्हणून सूडबुद्धीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप होता. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी नेमण्याची घोषणा केली होती. याच दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही अशाच प्रकारचा आरोप मागे केला होता.

follow us