Download App

खूशखबर! LPG गॅस सिलिंडरच्या दरात 57. 5 रुपयांची कपात, जाणून घ्या नवे दर

  • Written By: Last Updated:

LPG Price : दिवाळीपूर्वी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र आता तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या (LPG cylinder prices reduced) आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या एलपीजीच्या किमतीत 57. 5 रुपयांची कपात केली आहे. मुंबईत आजपासून हे दर लागू झाले आहेत. तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस वापरकर्त्यांना या सुधारणांमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

नेवाशात ज्ञानेश्वरसृष्टी तर प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारणार; मंत्री विखेंची माहिती 

गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच वस्तूंची महागाई ही लोकांसाठी चिंतेची बाब झाली. काहीच दिवसांपूर्वी 19 किलो व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 101.5 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ते पुन्हा कमी करण्यात आले आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसह चार महानगरांमध्ये हे नवीन दर लागू केले आहेत.

नवे दर-
मुंबई: 1,728
नवी दिल्ली: 1775.5
कोलकाता: 1885.5
चेन्नई: 1942

जायकवाडीला नगरमधून पाणी नाहीच; डीपीडीसीच्या बैठकीत ठराव, सर्वपक्षीय नेत्यांचा एकच सूर 

घरगुती गॅसच्या किमतीत बदल नाही
15 नोव्हेंबरच्या संध्याकाळी कंपनीने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती वापरासाठीच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजही मुंबईत घरगुती वापरासाठी 14.2 किलोचा सिलिंडर 902.50 रुपयांना मिळणार आहे. ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दोनशे रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती.

19 आणि 14.2 किलो एलपीजी सिलेंडरमध्ये काय फरक आहे?
हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या वजनात तफावत आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे वजन 19 किलोग्रॅम आहे आणि घरगुती एलपीजी सिलिंडरचे वजन 14.2 किलो आहे.

Tags

follow us