जायकवाडीला नगरमधून पाणी नाहीच; डीपीडीसीच्या बैठकीत ठराव, सर्वपक्षीय नेत्यांचा एकच सूर
Ahmednagar News : जायकवाडी धरणाला अहमदनगर जिल्ह्यातून पाणी न देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी दिली आहे. जायकवाडी धरणाला अहमदनगरमधून पाणी देण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, सध्याची जिल्ह्याची परिस्थिती पाहता पाणी देऊ नये अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकच सूर लावल्याने अखेर पाणी न देण्याचा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री विखे माध्यमांशी बोलत होते.
NIV Pune Bharti 2023: पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांची भरती, कोण करू शकतं अर्ज?
पालकमंत्री विखे म्हणाले, जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती पाहता व सर्व जनतेची मागणी पाहता आजच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये जायकवाडीला पाणी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. यासंदर्भातील ठराव आज करण्यात आला असून तो राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. आम्ही मराठवाड्यातील जनतेला सुद्धा यंदा आवाहन करणार आहोत की त्यांनी सुद्धा आमची परिस्थिती पाहता आम्हाला सहकार्य करावे.
तसेच दुसरीकडे काही जणांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे, त्यावर सुद्धा सुनावणी होणार आहे. पण नगर जिल्ह्यात आम्ही सर्व एकत्र येऊन हा निर्णय घेतला असल्याचेही विखे यांनी यावेळी सांगितले आहे. या निर्णयामुळे आम्हाला आता आवर्तनामध्ये अधिक प्रमाणामध्ये वाढ मिळेल व आम्ही अधिक आवर्तन देऊ शकणार आहोत. आवर्तनाचेही नियोजन करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं विखे यांनी स्पष्ट केलं.
Nana Patekar: नाना पाटेकरांनी चाहत्याला भर रस्त्यात लगावली, व्हिडीओ व्हायरल
सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी एकत्रितपणे आवर्तन सोडण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गोदावरी नदीतून 2 डिसेंबर, मुळा धरणातून 10 डिसेंबरला तर प्रवरामधून 11 डिसेंबरला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निलवंडे धरणातून सध्या आवर्तन सुरूच असल्याचंही विखे यांनी सांगितलं आहे.
Sam Bahadur : ‘सॅम बहादुर’च्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा
निळवंडेमध्ये जे आवर्तन सोडलं आहे. त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळत नव्हते म्हणून त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती, त्यामुळे आता 15 डिसेंबरपर्यंत निळवंडे कॅनॉलची चाचणी पूर्ण होणार आहे. उजव्या कालव्यातून पाणी लगेच कशा पद्धतीने सोडता येईल याबाबतचा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याचे पालकमंत्री विखे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यावेळी उपस्थित होते.
मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून एकूण 8.603 टीएमसी पाणी पैठण येथील जायकवाडी धरणात सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते. त्यानूसार अहमदनगरमधील मांडओहोळ, मुळा धरणातून 2.10 टीएमसी तर भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर धरणातून 3.36 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.