Download App

Stock Market : शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी 24,675च्या पातळीवर घसरला

  • Written By: Last Updated:

Share Market Update : तिसऱ्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. आज शेअर बाजारात पुन्हा घसरणीसह व्यवहार सुरू झाले. सुमारे 300 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 80,600 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 80 अंकांनी घसरला आणि 24,675 च्या आसपास व्यवहार करत होता. त्यानंतर निर्देशांक सुमारे 130 अंकांनी घसरला.

घसरणीसह बाजार उघडला

निफ्टी बँक निर्देशांक 60 अंकांनी घसरला आणि 51,220 च्या आसपास व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांकात मोठी घसरण झाली. बाजार उघडला तेव्हा सुमारे 400 अंकांचे नुकसान झाले होते. ऑटो शेअर्स घसरणीसह आयटी उघडले. घसरणीसह बाजार उघडल्यानंतर प्रॉफिट बुकींगमुळे घसरण आणखी वाढली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 800 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. बाजारातील या घसरणीमुळे इंडिया विक्स 3.51 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात सतत विक्री करत आहेत त्यामुळे सतत घसरण दिसून येत आहे.

अजय महाराज बारस्करांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांचा राडा; जरांगे पाटील समर्थक असल्याचा केला आरोप

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 5 शेअर्स वाढत आहेत. तर, 25 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी केवळ 7 शेअर्स वाढीसह उघडले आहेत तर 43 शेअर्सनी घसरणीसह व्यवहार सुरू केला आहे. तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये ॲक्सिस बँक 2.75 टक्के, आयशर मोटर्स 2.08 टक्के, विप्रो 1.79 टक्के, टीसीएस 0.59 टक्के, भारती एअरटेल 0.08 टक्के, आयसीआयसीआय (ICICI) बँक 0.054 टक्के वाढीसह उघडले. घसरलेल्या शेअर्समध्ये श्रीराम फायनान्स, इन्फोसिस, मारुती, टायटन, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, बीपीसीएल, बीईएल, अदानी एंटरप्रायझेस यांचा समावेश आहे.

सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण

आजच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रात घसरण आहे. बँकिंग, ऑटो, आयटी, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा, फार्मा, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजार उघडल्यानंतर घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप 452 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. जे गेल्या सत्रात 457 लाख कोटी रुपयांच्या जवळपास होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.

follow us