Stock Market: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; सेन्सेक्समध्ये 260 अंकांची वाढ, कोणते शेअर्स तेजीत?

  • Written By: Published:
Stock Market: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; सेन्सेक्समध्ये 260 अंकांची वाढ, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Today : आज सोमवारी (14 ऑक्टोबर) शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. सुमारे 300 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 81,700 च्या आसपास व्यवहार करत होता. या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या दोन आठवड्यांच्या चढ-उतारानंतर, गुंतवणूकदार आणि व्यापारी काही प्रमाणात स्थिरतेची अपेक्षा करत आहेत.

यामध्ये निफ्टी सुमारे 100 अंकांच्या वाढीसह 25,050 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी बँक 160 अंकांच्या वाढीसह 51,333 अंकांवर व्यवहार करत आहे. निफ्टीच्या आयटी निर्देशांकात सुमारे 350 अंकांची वाढ झाली. त्याच वेळी, मेटल निर्देशांक सुमारे 1.3% ने वाढला होता.

मोठी बातमी! एअर इंडियाच्या मुंबई-न्यूयॉर्क विमानाला बॉम्बस्फोटाची धमकी, विमान दिल्लीकडे वळवलं

जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत होते. बँकांच्या भक्कम निकालाच्या जोरावर शुक्रवारी अमेरिकन बाजारात चांगली तेजी दिसून आली. डाऊमध्ये 400 अंकांची वाढ झाली आणि विक्रमी पातळी गाठली, तर S&P 500 ने नवीन शिखर गाठले. Nasdaq 60 अंकांनी वर होता. सकाळी GIFT निफ्टी 35 अंकांनी वाढून 25,100 च्या जवळ होता. डाऊ फ्युचर्स सपाट होते आणि जपानचे बाजार आज बंद आहेत.

एचसीएल टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आज निकाल जाहीर करतील. दिग्गज संरक्षण कंपनी एचएएलला ‘महारत्न’ दर्जा मिळाला, त्यामुळे आज या स्टॉकवर गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube