Download App

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना

पुणे : पुण्यात एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसानीने या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या आत्महत्येतील मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. विषारी द्रव्य प्राशन करून या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे पुण्यातील मुंढवा परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार शेजारी राहणाऱ्या लोकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहीती दिली. त्यानंतर मुंढवा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचले आहेत. तर सध्या या घटनेचा तपास पोलिसांरकडून सुरू आहे.

दीपक थोटे५९ इंदू दीपक थोटे ४९ ऋषिकेश दीपक थोटे २४ आली समीक्षा दीपक थोटे १७ हे अमरावतीचे रहिवासी असलेले कुटुंब तीन महिन्यापूर्वीच पुण्यातील केशवनगर या परिसरात वास्तव्यात आले होते. मुलगा ऋषिकेश हा पैसा नावाची एक कंपनी चालवत होता.

या कंपनीत त्याला नुकसान झाल्याने त्यांनी जीवनातून आपल्या आई-वडील आणि बहिणीला जेवणातून विष देण्याची प्राथमिक माहिती मिळत असून यात या चारी जणांचा मृत्यू झाला असून या चारही जनाची मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले असून या घटनेचा तपास करत आहे आता या प्रकरणात पोलीस तपासानंतर काय समोर येणार ? हे कळणार आहे.

Tags

follow us