Download App

तपास यंत्रणांना मोठे यश; 26/11 चा सूत्रधार येणार भारताच्या ताब्यात; इतर आरोपी कुठे आहेत?

  • Written By: Last Updated:

मुंबई : भारताच्या तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि सध्या अमेरिकेच्या तुरुंगात असलेला तहव्वूर हुसेन राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेतील एका न्यायालयाने मंजुरी दिली आहे. कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी जॅकलिन चुलजियन यांनी या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. ‘ज्या गुन्ह्यांसाठी राणाच्या प्रत्यार्पणाची विनंती केली आहे त्या गुन्ह्यांसाठी त्याचे प्रत्यार्पण करणे योग्य आहे’, असे चुलजियन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. जून 2020 मध्ये भारताने राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.

कोण आहे राणा? अन् मुंबई हल्ल्यात त्याचा कसा सहभाग होता?

राणा हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड कोलमन हेडलीचा बालपणीचा मित्र आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान अमेरिकन सरकारच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानुसार राणाला हेडलीच्या लष्कर-ए-तैयबाशी (एलईटी) संगनमताची माहिती होती. राणाने हेडलीला मदत केली होती. पण राणाला भारताकडे कधीपर्यंत सोपविले जाईल याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. राणासह इतर अनेक दहशतवाद्यांनी जगातील चौथ्या क्रमांकाचे शहर गुडघ्यावर आणले होते. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. पण राणा हा मुंबई हल्ल्याचा एकटाच गुन्हेगार नाही.

कुठे आहेत राणासोबतचे इतर गुन्हेगार?

1. डेव्हिड कोलमन हेडली- मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. त्याला न्यायालयाने 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. डेव्हिड हा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या 12 प्रकरणांमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

2. हाफिज सईद- हाफिज सईद इस्लामिक दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक आहे. मुंबई हल्ल्यात हाफिज सईदचा मोठा हात होता. 2008 पासून त्याला पाकिस्तानमध्ये अनेक वेळा अटक करण्यात आली आहे, परंतु कोणत्याही हल्ल्यांसाठी त्याला कधीही दोषी ठरविण्यात आले नाही, प्रत्येक वेळी हल्ल्यातील सहभाग नाकारून तो तुरुंगातून सहीसलामत बाहेर येतो.

Sameer Wankhede यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, 22 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण

3. झकी-तुझा रहमान लखवी- झकी-तुझा रहमान लखवी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणूनही ओळखला जातो. लख्वी सध्या पाकिस्तानमध्ये 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. 2021 मध्ये त्याला दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

4. साजिद मीर- लष्कर-ए-तैयबाचा सदस्य साजिद मीर हा पाकिस्तानी नागरिक आहे. त्याला मुंबई हल्ल्याचा सूत्रधारही म्हटले जाते. 2022 मध्ये पाकिस्तानी न्यायालयाने मीरला दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्याला 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुरुवातीला पाकिस्तानने मीरचे अस्तित्व नाकारले होते. पुढे पाकिस्तानने त्यांचे अस्तित्व मान्य केले.

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार

5. अबू हमजा- सय्यद जबीउद्दीन अन्सारी उर्फ ​​अबू हमजा याला अबू जिंदाल या नावानेही ओळखले जाते. हमजा हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. औरंगाबाद येथील एक गुन्ह्यात त्याला 2016 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी तो लष्कर प्रमुख हाफिज सईदसह कराचीच्या नियंत्रण कक्षात उपस्थित होता, असा तपाय यंत्रणांचा दावा आहे. त्याने लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांचा हँडलर म्हणूनही काम केले आणि त्यांचा हिंदी शिक्षकही होता.

Tags

follow us