Download App

Task fraud : ऑनलाईन जॉबच्या अमिषाने वेगवेगळ्या बॅंक खात्यांतून लुटायचे; गुजरातमधून दोघं ताब्यात

  • Written By: Last Updated:

Task fraud : सध्या ऑनलाईन जॉबचे (Task fraud) अमिष दाखवून अनेक फसवणुकीची प्रकरण समोर येत आहेत. असाच प्रकार मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली होती की, त्याला अज्ञात लोकांनी ऑनलाईन नोकरीचं अमिष दाखवत फसवणूक केली आहे.

आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिलं तुम्ही पडाल, संजय राऊतांचा हल्लाबोल

या विद्यार्थ्याला व्हाट्सअपच्या माध्यमातून पार्ट टाइम ऑनलाईन जॉबची ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर त्याला टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर या आरोपींनी या तरुणाला जास्तीत-जास्त कमाई करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करायला सांगितलं. या तरुणाने या आरोपींची तब्बल 2.45 लाख रुपयांचे व्यवहार केले. मात्र हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येतात. त्याने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गुजरातच्या गांधीनगरमधून 33 वर्षीय रुपेश ठक्कर आणि 34 वर्षे पंकज भाई ओड या दोघांना ताब्यात घेतलं.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

या आरोपींच्या खात्यांवरून गेल्या तीन महिन्यात तब्बल 60 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी सध्या 1.1 कोटी रुपये रक्कम असलेले. हे खाते फ्रीज केले आहे. तसेच या आरोपींकडे पोलिसांना तब्बल 33 डेबिट /क्रेडिट कार्ड, वेगवेगळ्या बँकांची तब्बल 32 चेकबुक, सहा मोबाईल फोन आणि तब्बल 28 सिम कार्ड ताब्यात घेण्यात आले आहेत.

स्वतःचंच अपहरण, वडिलांकडून खंडणीची मागणी…

पैशांसाठी कोण काय करेल याचा अंदाजच लावता येत नाही. आताही डोके चक्रावून टाकणारी अशीच एक घटना पालघर जिल्ह्यातून (Mumbai News) समोर आली आहे. पैशांची गरज होती म्हणून मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आणि चक्क वडिलांकडेच पैशांची मागणी केली. वडिलांना पैसे ऑनलाइन जमा करता यावेत यासाठी एक क्यूआर कोडही पाठवला. पोलिसांनीच या घटनेचा खुलासा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली असून याच घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या घटनेत पोलिसांनी मुलाला बेड्या ठोकून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.

follow us