आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिलं तुम्ही पडाल, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्च्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी भाषणाला सुरुवात करताना गळ्यातील पंचा फिरवला. आमच्या पाडापाडीत पडाल तर पहिले तुम्ही पडाल. इकडे येऊन पाहा, हवा बहुत तेज चल रही है अजितराव, टोपी उड जायेगी, असे संजय राऊत म्हणाले.
अमोल कोल्हे यांनी आपल्या नेत्यांबरोबर, पक्षाबरोबर इमान राखले. ते बेईमान झाले नाहीत म्हणून त्यांना पाडणार का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र महाराष्ट्र इमानदारासोबत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केला.
शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे जर अमित शहांकडे गेले असते तर ते म्हणाले असते रामलल्लाचं दर्शन फ्री मध्ये करुन देतो. 2 कोटी रोजगार देणार होते त्यावर पण रामलल्लाचं दर्शन फ्री मध्ये करुन देतो असं उत्तर आहे, असं संजय राऊत म्हणाले.
EVM नसेल तर भाजप ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील जिंकू शकत नाही. नगरपालिका पण जिंकणार नाही. चारशे पार, तीनशे पार हे जे सुरु आहे ते EVM ची जादू आहे. शिवसेनेची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती आहे पण भाजपची युती EVM सोबत आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
‘परिस्थिती अशीच राहिली तर फिरणंही मुश्किल होईल’; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट इशारा
महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता सध्याच्या सरकारने दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखा ठेवला आहे. पाय पुसायचे आणि पुढं जायचं. आज महाराष्ट्र लुटला जातोय, शेतकरी लुटला जातोय. हा महाराष्ट्र देशाचं पोट भरत होता. पण आज महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योग गुजरातला पळवला जातोय, असे संजय राऊत म्हणाले.
Sharad Pawar : मी 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले, पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघितले जात नाही…
सर्व्हे वगैरे सर्व खोट आहे. 2024 ला मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येईल आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. अनेकजण म्हणतात मोदींनी अनेक गोष्टी विकल्या पण त्यांनी काही गोष्टी खरेदी पण केल्या आहेत. कोर्ट खरेदी केलं, निवडणूक आयोग खरेदी केलं, त्यांनी महाराष्ट्रातले खासदार आणि आमदार विकत घेतले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आमच्याकडं ईडी आली, घेऊन गेली पण आम्ही ईमान विकला नाही. आमचा संघर्ष सुरु आहे. ज्यांनी आम्हाला जेलमध्ये घातलं त्यांनाही जेलमध्ये घालू नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सांगणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.