Download App

उद्धव ठाकरेंची कोंडी! मनपा निवडणुकीआधीच मोठ्या नेत्याचा जय महाराष्ट्र; शिंदे गटात प्रवेश

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या राजुल पटेल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. ठाकरे गटालाही जोरदार (Uddhav Thackeray) धक्का बसला. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची सर्वाधिक चर्चा होत आहे. या निवडणुकीसाठी तयारी सुरू झालेली असतानाच ठाकरे गटाला जोरदार धक्के बसू लागले आहेत. नेते आणि कार्यकर्ते पक्षाला जय महाराष्ट्र करू लागले आहेत. आताही राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे.

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. काल सोमवारी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीने ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीआधी मोठा धक्का बसला आहे. मुंबईत पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संभाजीनगरमध्ये ठाकरेंना धक्का, 50 पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

राजुल पटेल यांनी पक्ष सोडण्यामागे कारण आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत वर्सोवा मतदारसंघातून तिकीट मागितले होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तेव्हापासून त्या नाराज असल्याची चर्चा होती. मी 40 वर्षे पक्षात काम केलं. या काळात पक्षान मला न्याय देखील दिला. परंतु, पक्षात असेही काही असतात ज्यांना आपल्यामुळे काही अडचणी असतात. आता अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे असे राजुल पटेल पक्ष प्रवेशावेळी म्हणाल्या.

ठाकरे गटात तुम्ही नाराज होतात का असे पत्रकारांनी विचारले असता पटेल म्हणाल्या, मी मागील वेळी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढली होती. तेव्हा मला 32 हजार मते मिळाली होती. त्यामुळे मला वाटत होते की जर यंदा मला पक्षाने तिकीट दिले तर मी 25 हजार मतांनी निवडून आले असते. परंतु, पक्षांतर्गत राजकारणामुळे या गोष्टी शक्य झाल्या नाहीत.

महापालिका निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊत म्हणाले, स्बळाचा नारा फक्त मुंबईपुरता..  

मुंबई ठाकरे स्वबळावर लढणार..

महापालिका तसंच जिल्हा परिषदेच्या निडवणुका होणार असल्यानं पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. या बैठकीत संघटनात्मक बांधणीकडं लक्ष देणं गरजेचं आहे, यासह अनेक विषयावर चर्चा झाली. बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला, तर काहींनी महाविकास आघाडीसोबत लढलं पाहिजे, प्रत्येकाच्या काही भूमिका आहे. पण मुळात प्रत्येक बूथवर मजबुतीने काम करणं गरजं आहे. त्यामुळं आम्ही महानगर पालिका ताकतीने लढवू, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

follow us