Download App

मोठी बातमी! कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; सहा जणांचा मृत्यू

कल्याण पूर्वमधील चिकणी पाडा परिसरात चार मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला.

Kalyan Building Collapsed : राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. आज राज्यात पावसाने सर्वदूर हजेरी (Unseasonal Rain) लावली. यातच एक धक्कादायक बातमी कल्याणमधून आली आहे. कल्याण पूर्वमधील चिकणी पाडा (Kalyan News) परिसरात चार मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सप्तशृंगी असे या इमारतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत आठ जणांना वाचविण्यात यश मिळालं आहे. आणखीही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

ही इमारत कल्याण पूर्वमधील मंगलराघो नगर भागात आहे. या चार मजली इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याच दरम्यान अचानक स्लॅब कोसळला. यावेळी मोठा आवाज झाला. हा स्लॅब थेट इमारतीच्या तळ मजल्यापर्यंत कोसळत गेला. त्यामुळे या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले. काही जणांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. आणखी कुणी अडकलं आहे का याचा शोध घेतला जात आहे.

Pune News : चिखलीतील पडलेल्या 36 बंगल्यावाल्यांना बिल्डरने दिलं मोठं आश्वासन…

या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे समोर आली आहेत. यात अरुणा रोहिदास गिरणारायन, शरवील श्रीकांत शेलार, विनायक मनोज पाधी, यश क्षीरसागर, निखील खरात, श्रद्धी साहू जखमी झाले आहेत. तर या दुर्घटनेत प्रमिला साहू, नामस्वी शेलार, सुनीता साहू, सुजाता पाडी, सुशीला गुजर, व्यंकट चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी दुरुस्तीचे काम सुरू होते तेव्हा इमारतीत अनेक जण होते. इमारतीच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरील काही घरांत नातेवाईक आले होते अशी माहिती आता समोर आली आहे.

follow us