Kalyan News : आमदार गणपत गायकवाड यांचा पोलिस कोठडीत अन्नत्याग

Kalyan News : आमदार गणपत गायकवाड यांचा पोलिस कोठडीत अन्नत्याग

Mla Ganpat Gaikwad : पोलिस ठाण्याच गोळीबार केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) पोलिस कोठडीत आहेत. पोलिस कोठडीत असताना गणपत गायकवाड यांनी अन्नत्याग केल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्रीपासून गणपत गायकवाड यांनी जेवण केलेलं नसल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. पोलिसांच्या आग्रहाने त्यांनी दिवसभरात एकदाच चहा घेतल्याची माहिती आहे.

काँग्रेसच्या गतीने काम केलं असतं तर100 पिढ्या निघून गेल्या असत्या, पीएम मोदींचा निशाणा

उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाकडून गणपत गायकवाड यांनी 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीत असताना आज त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी पोलिस कोठडीत असताना जेवण करण्यासाठी नकार दिला आहे. गायकवाड यांनी जेवणास का नकार दिलायं, अन्नत्याग का करताहेत याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

यवतमाळच्या तरुणाने बनवली देशातील पहिली ‘AI कार’; शार्क टँकच्या जजेसेंनी दिला अजब सल्ला

नेमकं प्रकरण काय?
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार केला आहे. या घटनेत महेश गायकवाड यांना दोन तर त्यांच्या मित्राला दोन गोळ्या लागल्या असून दोघेही जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आमदार गायकवाड यांच्या मुलामध्ये आणि महेश गायकवाड या दोघांमध्ये 50 गुंठे जमिनीचा वाद सुरु होता. या वादाबाबत आज उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात बैठक सुरु होती. यावेळी आमदार गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील हा वाद मिटण्याऐवजी गोळीबाराची घटना घडली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर घटनेचे तीव्र पडसाद उमटताच पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा थरारक प्रकार घडल्या आता समोर आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube