काँग्रेसच्या गतीने काम केलं असतं तर100 पिढ्या निघून गेल्या असत्या, पीएम मोदींचा निशाणा
Narendra Modi : आमच्या सरकारची तिसरी टर्म फार दूर नाही. फक्त 100-125 दिवस उरले आहेत. मी आकड्यांवर जात नाही, पण मी देशाचा मूड पाहू शकतो. यात एनडीए 400 पार करेल आणि भाजपला नक्कीच 370 जागा मिळतील. सरकारची तिसरी टर्म खूप मोठे निर्णय घेणारी असेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) रणशिंग फुंकले.
विरोधी पक्ष काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देशात ज्या गतीने प्रगती करत आहे त्याची कल्पनाही काँग्रेस सरकार करू शकत नव्हते. आम्ही गरीबांसाठी 4 कोटी घरे बांधली, त्यापैकी 80 लाख पक्की घरे शहरी गरिबांसाठी बांधली. काँग्रेसच्या गतीने काम झाले असते, तर एवढे काम पूर्ण व्हायला 100 वर्षे लागली असती, 100 पिढ्या निघून गेल्या असत्या.
काँग्रेसने ओबीसींवर अन्याय केला
काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकारने ओबीसींना न्याय दिला नाही. काही दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. 1970 मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे सरकार अस्थिर करायला काय काय केले नाही? काँग्रेसला ओबीसींचे काही देणंघेणं नाही. सरकारमध्ये किती ओबीसी आहेत ते मोजत राहतात. काँग्रेसला इथे सर्वात मोठा ओबीसी दिसत नाही का? असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला.
तावडेंच्या आनंदावर सुप्रीम कोर्टाचे विरजण; चंदीगड महापौर निवडणुकीत सरन्यायाधीशांचा भाजपला दणका
विरोधी आघाडी ‘इंडिया’चा समाचार घेतला
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’आघाडीवर टीका करताना पीएम मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भानुमतीचे कुळ जोडले गेले आणि मग ते एकला चलो रे करू लागले. आघाडीची जुळवाजुळव बिघडली. त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही मग देशातील जनता त्यांच्यावर कसा विश्वास ठेवणार, अशी टीका करत म्हणाले काँग्रेसच्या काळात ईडीने 5 हजार कोटी रुपये जप्त केले होते. आमच्या कार्यकाळात 1 लाख कोटी रुपये जप्त करण्यात आले.
Ram Mandir ची निर्मिती केवळ ईश्वराच्या इच्छेमुळेच शक्य झाली, मोहन भागवतांचं प्रतिप्रादन