तावडेंच्या आनंदावर सुप्रीम कोर्टाचे विरजण; चंदीगड महापौर निवडणुकीत सरन्यायाधीशांचा भाजपला दणका

तावडेंच्या आनंदावर सुप्रीम कोर्टाचे विरजण; चंदीगड महापौर निवडणुकीत सरन्यायाधीशांचा भाजपला दणका

चंदीगड : व्हिडीओमध्ये आम्ही जे काही बघितले ती लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही पुरते हादरुन गेलो आहोत. आम्ही लोकशाहीची अशी हत्या होऊ देऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चंदीगड महापालिकेची सात फेब्रुवारी रोजी होणारी पहिली बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय नवीन महापौरांच्या कामकाजावरही तूर्तास बंधने घालण्यात आली आहेत. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. (Supreme Court has postponed the first meeting of the Chandigarh Municipal Corporation on February 7 indefinitely)

गत आठवड्यात पार पडलेल्या चंदीगड महापौर निवडणुकीला (Chandigarh Municipal Corporation) आव्हान देत आम आदमी पक्षाचे पराभूत उमेदवार कुलदीप कुमार (Kuldeep Kumar) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

यावेळी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी एका पेनड्राईव्हमधून पीठासीन अधिकाऱ्याचा कथितरित्या मते बाद करतानाचा व्हिडीओ खंडपीठापुढे सादर केला. यात पीठासीन अधिकारी मतपत्रिकेवर पेन वापरत असल्याचे दिसले होते. तसेच भाजपचे उमेदवार मागच्या दाराने कसे येतात आणि महापौरांच्या खुर्चीवर बसतात हेही दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयही सुन्न झाले.

मुलांना निवडणुकांच्या राजकारणात आणू नका; लोकसभांच्या तोंडावर EC च्या राजकीय पक्षांना सूचना

सरन्यायाधीश म्हणाले, आम्ही जे काही बघितले ती लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही पुरते हादरलो आहोत. आम्ही लोकशाहीची अशा प्रकारे हत्या होऊ देऊ शकत नाही. त्यांनी (पीठासीन अधिकारी) मतपत्रिका खराब केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पीठासीन अधिकाऱ्याने कॅमेऱ्यात बघितल्यावर सरन्यायाधीशांनी कॅमेऱ्यात का बघत आहात? हे एका पिठासीन अधिकाऱ्याचे वर्तन आहे का? असे सवालही केले.

यानंतर न्यायालयाने सर्व कागदपत्रे, मतपत्रिका आणि सर्व व्हिडिओ पुराव्यांसह संपूर्ण रेकॉर्ड संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय पीठासीन अधिकाऱ्याला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने चंदीगड महापालिकेची येत्या सात फेब्रुवारी रोजी होणारी पहिली बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच नवीन महापौरांच्या कामकाजावरही तूर्तास बंधने घालण्यात आली आहेत. आजच्या सुनावणीनंतर या प्रकरणाची सुनावणी 12 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

‘रिसॉर्ट’ पॉलिटिक्समुळे वाचलं सोरेन सरकार; जाणून घ्या यापूर्वी कोणतं सरकार पडलं अन् वाचलं

चंदीगडमध्ये कमळ :

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि चंदीगडचे प्रभारी विनोद तावडे यांनी चंदीगडमध्ये सलग तिसऱ्या वर्षी बहुमत नसतानाही भाजपचा महापौरपदाचा उमेदवार विजयी केला गत आठवड्यात महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या मनोज सोनकर यांनी दणदणीत विजयी मिळविला. त्यांनी आम आदमी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांचा चार मतांनी पराभव केला. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र येत बहुमताचा आकडा तयार केला होता. मात्र निकालानंतर या दोन्ही पक्षांची आठ मते अपात्र ठरली. त्यामुळे भाजपच्या सोनकर यांचा चार मतांनी विजयी झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube