‘रिसॉर्ट’ पॉलिटिक्समुळे वाचलं सोरेन सरकार; जाणून घ्या यापूर्वी कोणतं सरकार पडलं अन् वाचलं
Jharkhand Floor Test & Resort Politics : मध्यंतरीच्या एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर सर्व आमदार व्हाया गुवाहाटी गोवा आणि नंतर मुंबईत दाखल झाले होते. याकाळात हॉटेल आणि तेथे होणारी खलबतं यांची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा रिसॉर्ट पॉलिटिक्स चर्चेत आले आहे. यावेळी कारण ठरलं आहे ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची अटक. सोरेन यांच्या अटकेनंतर ऑपरेशन लोटसचा धोका लक्षात घेता काँग्रेस आणि जेएमएम म्हणजेच झारखंड मुक्ती मोर्चाकडून सुमारे 35 आमदारांना हैदराबाद येथील रिसॉर्ट येथे हलवले आणि सुरू झाली ती रिसॉर्ट पॉलिटिक्सची चर्चा. आता हे रिसॉर्ट पॉलिटिक्स सरकार पाडण्यासाठी आणि सरकार वाचवण्यासाठी नेमकं कसं काम करतं हे आपण जाणून घेणार आहोत.
मोठी बातमी : झारखंडमध्ये पुन्हा ‘सोरेन’ राज; 47 आमदारांच्या पाठिंब्यावर चंपाई यांनी सिद्ध केलं बहुमत
झारखंडमधील राजकीय भूकंपानंतर रिसॉर्ट पॉलिटिक्ससाठी आमदारांना एखाद्या हॉटेलमध्ये हलवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही देशातील अनेकं सरकार वाचवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स करण्यात आलेले आहे. रिसॉर्ट पॉलिटिक्सचा सर्वाधिक वापर झारखंडमध्येच सरकार वाचवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी केला गेला. कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र हे देशातील रिसॉर्ट पॉलिटिक्सचे मोठे केंद्र मानले जाते. झारखंडमधील सरकार वाचवण्यासाठी आणि पाडण्यासाठी रिसॉर्ट राजकारणाचा सर्वाधिक वापर केला गेला. 2005 पासून झारखंडमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्सचा वापर किमान 4 वेळा करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा, दलालांना धडकी : पेपर फोडणाऱ्यांना घाम फुटेल असा मोदी सरकारचा कायदा
भारतातील रिसॉर्ट पॉलिटिक्सची सुरुवात कशी झाली?
1982 मध्ये भारतात पहिले रिसॉर्ट पॉलिटिक्सचे प्रकरण समोर आले. हरियाणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर INLD च्या देवीलाल यांनी भाजपसोबत युती केली. INLD आणि भाजप युतीला 90 पैकी 48 जागा मिळाल्या होत्या. मात्र, INLD ला ही युती तुटू शकते अशी भीती वाटू लागली आणि देवीलाल यांनी 48 आमदारांना दिल्लीतील हॉटेलमध्ये हलवले. परंतु, हॉटेलमध्ये नेण्यात आलेले आमदारांनी हॉटेलमधून पळ काढला आणि देवीलाल यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. यानंतर 36 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने हरियाणात सरकार स्थापन करत भजनलाल मुख्यमंत्री झाले.
Video : तीन ठिकाणचा ताबा द्या, अन्य मशिदींकडे बघणारही नाही! गोविंददेव गिरी महाराजांचा मोठा दावा
कधी कधी रंगला आहे रिसॉर्ट पॉलिट्क्सचा खेळ
1983 मध्ये कर्नाटकमध्ये जनता पक्षाचा विजय झाला आणि रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले, परंतु लवकरच त्यांना पक्षात फूट पडण्याची भीती वाटू लागली. त्यावेळी हेगडे यांनी 80 आमदरांना बेंगळुरू येथील रिसॉर्टमध्ये हलवले. हेगडे यांची ही युक्ती कामी आली आणि त्यांचे सरकार वाचले.
1984 मध्ये आंध्र प्रदेशात रिसॉर्ट राजकारणाचा खेळ रंगला होता. मुख्यमंत्री एनटी रामाराव शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत गेले असताना त्यांच्याच पक्षाचे एन भास्कर राव यांनी सरकार पाडले. राज्यपालांच्या मदतीने भास्कर राव मुख्यमंत्रीही झाले. ही बाब ज्यावेळी एनटीआर यांना कळाली तेव्हा ते आंध्रला परतले. त्यांनी आपल्या निष्ठावंतांची बैठक घेऊन सर्व आमदारांना दिल्लीला हलवले. एनटीआर यांचा रिसॉर्ट डाव यशस्वी झाला आणि शेवटी भास्कर राव यांना राजीनामा द्यावा लागला.
किंडल अन् टिंडरमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती गोंधळले; अचानक बदललं कोर्टरूमचं धीरगंभीर वातावरण
याशिवाय युपीत 1998 तर, 2002 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सरकार कोसळण्याच्या भीती वाटू लागल्याने त्यांनी आमदारांना आधी इंदूर आणि नंतर म्हैसूरला पाठवले होते. विलासरावांची ही चाल यशस्वी झाली आणि त्यावेळचे सरकार वाचवण्यात काँग्रेसला यश आले. असे अनेक प्रसंग आहे ज्यात सरकार वाचण्यात रिसॉर्ट पॉलिटिक्सने महच्च्वाचे भूमिका निभावली.
‘झारखंड टायगर’ चंपाई सोरेन आहेत तरी कोण?
मात्र, रिसॉर्ट पॉलिटिक्सने केवळ देशातील सरकारं वाचवण्याचीच नव्हे तर, सरकारं पाडण्यासाठीदेखील भूमिका निभावली आहे. 1995 मध्ये आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांनी रिसॉर्ट पॉलिटिक्सच्या वापर करून एनटीआर सरकार पाडले होते. 2019 मध्ये कुमारस्वामी सरकार पाडण्यातही याच रिसॉर्टची भूमिका मोठी होती. या घटनेत काँग्रेस आमदार रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे 18 आमदार बंडाचे बिगुल वाजवत महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये आले होते. हे आमदार हॉटेलमध्ये पोहोचताच महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. त्यावेळी आमदारांनी केलेल्या बंडामुळे कुमारस्वामी यांचे सरकार पडले होते. याच पद्धतीने 2020 मध्ये मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे, 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आले आणि एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली.