‘आदिवासी असल्यानं मला टार्गेट केलं’; हेमंत सोरेन यांनी फ्लोर टेस्टमध्ये खेळलं आदिवासी कार्ड

  • Written By: Published:
‘आदिवासी असल्यानं मला टार्गेट केलं’; हेमंत सोरेन यांनी फ्लोर टेस्टमध्ये खेळलं आदिवासी कार्ड

Hemant Soren : कथित जमीन घोटाळ्यात अटक केलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरे (Hemant Soren) यांनी सोमवारी चंपई सोरेन (Champai Soren) सरकारच्या बहुमत चाचणीत भाग घेतला. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत सहभागी होताना हेमंत सोरेन यांनी आदिवासी कार्ड खेळून भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्ला चढवला. न्यायालयाच्या परवानगीने फ्लोअर टेस्टसाठी हजर झालेले सोरेन यांनी आपली अटक ही देशाच्या लोकशाहीची काळी रात्र असल्याची टीका केली. दलित आणि आदिवासींवर अत्याचार होत असल्याचा आरोप सोरेन यांनी केला. आपण आदिवाशी असल्यानं आपल्याला टार्गेट केलं जातंय, असंही ते म्हणाले.

मोठी बातमी : झारखंडमध्ये पुन्हा ‘सोरेन’ राज; 47 आमदारांच्या पाठिंब्यावर चंपाई यांनी सिद्ध केलं बहुमत 

हेमंत सोरेन यांनी त्यांच्या अटकेसाठी राजभवनावर आरोप केले. ते म्हणाले, ‘३१ जानेवारीची काळी रात्र, हा काळा अध्याय देशाच्या लोकशाहीशी नव्या पद्धतीने जोडला गेला आहे. देशात पहिल्यांदाच 31 तारखेच्या रात्री मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. ही घटना घडवण्यात राजभवनचाही कुठेतरी सहभाग आहे, असे मला वाटते. ही घटना ज्या पद्धतीने घडली, त्याचे मला खूप आश्चर्य वाटते. मी आदिवासी समाजातून आलोय, त्यामुळं मला टार्गेट केलं जात आहे. आदिवाशीमध्ये नियम आणि कायदे आणि माहितीचा अभाव असतो. आदिवाशींची बौद्धिक क्षमता अजूनही आपल्या विरोधांएवढी नाही. पण, प्रत्येक माणसाला आणि प्राण्यांना योग्य आणि अयोग्याची समज असते, असं सोरेन म्हणाले.

Pragya Kapoor: चित्रपट निर्मात्या प्रग्या कपूर हिने लाँच केला इको-फ्रेंडली फॅशन ब्रँड 

आपल्या अटकेची तयारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू होती, असं सोरेन म्हणाले. पुढं बोलतांना ते म्हणाले, ‘आज कुठेतरी असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये समानता असावी, हे स्वप्न होतं. मला वाटतं की, बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारे आपला समाज सोडून बौद्ध धर्म स्वीकारावा लागला होता. तेच आता आदिवाशींसोबत करण्याची तयारी सुरू आहे. आदिवाशी दलितांबाबत द्वेषाचे राजकारण केलं जातंय. आम्हाला जंगलात जाण्यासा सांगितलं जात आहे. आदिवासी, दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांवर अत्याचाराचे सातत्याने अत्याचार सुरू आहेत. मलाही मी आदिवाशी असल्यानं टार्गेट केलं जातंय, असं सोरेन म्हणाले.

हेमंत सोरेन म्हणाले, ‘ईडीने आज मला अटक केली, याचा मला कोणताही पश्चाताप नाही. मी अश्रू ढाळणार नाही. झारखंडचा मान, सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा निघाला आहे. झारखंडवर जो कोणी वाईट नजर टाकेल त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप सिध्द झाले तर मी राजकारण सोडेन. मला तुरूंगात डांबून त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असंही सोरेन यांनी केंद्र सरकारला ठणकावलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज