मोठी बातमी : झारखंडमध्ये पुन्हा ‘सोरेन’ राज; 47 आमदारांच्या पाठिंब्यावर चंपाई यांनी सिद्ध केलं बहुमत
CM Champai Soren : झारखंडमध्ये सोमवारी (दि.5) चंपाई सोरेन सरकारची लिटमस टेस्ट झाली, यात सरकारला वाचवण्यात सोरेन यांना यश आले आहे. 47 आमदारांच्या पाठिंब्यावर चंपाई सोरेन (CM Champai Soren) यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सिद्ध केला. यावेळी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेनही (Hemant Soren) उपस्थित होते. फ्लोअर टेस्ट दरम्यान महाआघाडीच्या बाजूने 47 मते पडली, तर 29 मते विरोधात पडली. (Jharkhand CM Champai Soren Proves Majority In Assembly )
‘रिसॉर्ट’ पॉलिटिक्समुळे वाचलं सोरेन सरकार; जाणून घ्या यापूर्वी कोणतं सरकार पडलं अन् वाचलं
#WATCH | CM Champai Soren led Jharkhand government wins floor test after 47 MLAs support him
29 MLAs in Opposition. pic.twitter.com/OEFS6DPecK
— ANI (@ANI) February 5, 2024
झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. आपल्या अटकेपूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त त्यानंतर चंपाई सोरेन यांची JMM च्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. आणि चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज नव्या सरकारचा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आज पार पडला. यामध्ये चंपाई सोरेन यांना एकूण 47 तर विरोधी पक्षाला एकूण 29 मते मिळाली. यावेळी न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार, हेमंत सोरेन यांनीही मतदान केलं.
Rohit Saraf: रोहित सराफची राजस्थानच्या सांस्कृतिक समृद्धीची सफर पाहिलीत का?
81 जागा असलेल्या झारखंड विधानसभेत बहुमतासाठी 41 सदस्यांची आवश्यकता होती. जेएमएमच्या नेतृत्वाखालील युतीकडे 48 आमदारांचे पूर्ण बहुमत होतं. यात JMM चे 29, काँग्रेसचे 17, RJD आणि CPI (ML) चे प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश होत. तर एनडीएकडे 29 आमदार होते. त्यातील 26 जागा भाजपकडे होत्या. दरम्यान, जेएमएमच्या नेतृत्वाखालील एका आमदारवर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं एक आमदार फ्लोअर टेस्टसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळं चंपाई सोरेन यांना एक मत कमी पडलं.
यावेळी हेमंत त सोरेन यांनी केलेल्या भाषणात ईडीला चॅलेंज दिले. मला साडे आठ एकर जमीन घोटाळाप्रकरणात मला अटक करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये हिंमत असले तर त्यांनी पुरावे दाखवावेत. जमीन माझ्या नावावर नोंदणीकृत असल्याची कागदपत्रे दाखवावीत. हे जर सिध्द झाले तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान सोरेन यांनी दिले.
यावेळी हेमंत सोरेन यांनी आपल्या भाषणात ईडीला आव्हान दिले. साडेआठ एकर जमीन घोटाळ्याप्रकरणी मला अटक करण्यात आली आहे. हिम्मत असेल तर ती जमीन माझ्या नावावर असल्याचे पुरावे दाखवा. जमीन माझ्या नावावर असल्यचां सिध्द झालं तर मी राजकारण सोडेन, असं सोरेन म्हणाले.
सोरेन म्हणाले, ‘ईडीने आज मला अटक केली, याचा मला कोणताही पश्चाताप नाही. मी अश्रू ढाळणार नाही. मला तुरूंगात डांबलं तरी त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असंही सोरेन यांनी केंद्र सरकारला ठणकावलं.