Download App

धर्मवीर आनंद दिघेंनी सुरु केलेली रक्तदानाची प्रथा कायम – मुख्यमंत्री

ठाणे : नवीन वर्षानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याची धर्मवीर आनंद दिघे यांची प्रथा आजही कायम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात केलंय.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबीराला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून एक वेगळाच आर्दश निर्माण केला. ठाण्यातील शिवाजी मैदान येथे आयोजित शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

तसेच त्यांना रक्तकर्ण देखील देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाची सुरुवात रक्तदानापासून करत आहोत. कोविड काळात याच ठिकाणी 11 हजारांपेक्षा अधिक रक्तदान केले. रक्तदान काहींना जमले नाही. नाहीतर 25 हजार लोकांनी रक्तदान केले असते.

लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 5 कोटी निधी वाटप केला. सर्व रुग्णांना फायदा होईल, असा निधी वाढवत आहे. पोलिसांनी महिलांनी देखील रक्तदान केले सर्वांना शुभेच्छा देत असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

दरम्यान, यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, पोलिस उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड आणि गणेश गावडे यांनी देखील रक्तदान केले. नवीन वर्षाच्या माध्यमातून राज्य प्रगती पथावर जाणार असून राज्यात नवीन प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचंही मुख्यंमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us