मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईसह उपनगरात चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळं अनेक भागात पाणी साचलं असल्यानं वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली. तर आता मुंबईच्या पश्चिम उपनगरांना सेवा देणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या मागाठाणे स्थानकाजवळ (Magathane station) जमीन खचली. या घटनेमुळं परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महा मुंबई मेट्रोने (Maha Mumbai Metro) या घटनेची दखल घेत येथील परिस्थिती सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. याशिवाय, सुरक्षेच्या कारणास्तव मागाठाण मेट्रो स्थानकातील आणि बाहेरील मार्ग तात्पुरते बदलण्यात आले आहेत. (The road outside the Magathane metro station is breaked, the metro has changed the route to the station)
गेल्या वर्षीच हा रस्ता मागाठाणे मेट्रो स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांसाठी सुस्थितीत आणण्यात आला होता. सध्या मागाठाणे स्थानकाजवळ सी.सी. आय प्रोजेक्टस प्रा. लि. या विकासकाच्या रिव्हर्ली पार्क प्रकल्पाच्या बांधकाम सुरू आहे. या बांधकामादरम्यान, खोदकाम करण्यात येत आहे. हे खोदकाम करत असतांना भूस्खलन होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण भिंत उभी करणं गरजेचं आहे. मात्र, असं न केल्यानं हा रस्ता खचला.
या दुर्घटनेमुळं बांधकाम व्यावसायिकांच्या कामांवर स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले असून, कोणाच्या जीवाच्या बरे-वाईट झालं असतं तर याला जबाबदार कोण? असा असालही केला आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद हणमंत जाधव म्हणाले की, महामार्गाची दुरवस्था झाली असून मेट्रो स्थानकावरून खाली येण्यासाठी रस्ता नाही. हायवे सिग्नलपर्यंतचा संपूर्ण रस्ता चिखलाने माखलेला आहे. 30 ते 40 डंपर याठिकाणी उभे असून अपघात होण्याची भीती आहे, या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला.
महामुंबई मेट्रो परिवहन महामंडळ काय म्हणते?
– मागाठाणे मेट्रो स्थानकात येण्या-जाण्याच्या मार्गात काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत
– महापालिका क्षेत्रातील रस्त्याचा काही भाग खचला आहे.
– प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
– मागाठाण स्टेशनवरील उत्तरेकडील जिना/सरकता जिना तात्पुरता बंद आहे.
– उत्तरेकडील लिफ्ट बंद ठेवण्यात आली आहे.
– प्रभावित क्षेत्राचा कॉनकोर्सचा भागही प्रतिबंधित करण्यात आला आहे.
–
मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही.
*प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना!*
मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या प्रवेश आणि निकासात काही तात्पुरते बदल करण्यात आहे. या स्थानकाजवळील @mybmc अखत्यारित येणाऱ्या रस्त्यावरील काही भाग खचला असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन काही तात्पुरत्या केलेल्या बदलाची नोंद घेऊन आपला… pic.twitter.com/DAsPqMeCGV
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) June 28, 2023