Download App

मुंबईत MMRDA इमारतीच्या पार्किंगमधील कारमध्ये बॉम्ब? परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल

  • Written By: Last Updated:

A bomb in Bandra Kurla Complex : मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीएच्या इमारतीच्या (MMRDA Building) पार्किंगमध्ये एका गाडीत बॉम्ब (A bomb in car) असल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसर रिकामा केला. मात्र, घटनास्थळी बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, बॉम्ब असल्याचा माहिती देणारा चालक नशेत आढळून आला असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

मुंबईत MMRDA इमारतीच्या पार्किंगमधील कारमध्ये बॉम्ब? परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील फॅमिली कोर्टाच्या मागे एमएमआरडीएची इमारत आहे, या इमारतीच्या पार्किंगमधील एका कारमध्ये बॉम्ब असल्याचा माहिती पोलिसांना फोनद्वारे मिळाली होती. या इमारतीच्या बाजूला जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन देखील आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा देखील याच भागात असल्यानं मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, दौऱ्यापूर्वी बॉम्बची अफवा पसरल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली आहे. बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकाची गाडी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकालाही पाचारण कऱण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच परिसर रिकामा केला. एमएमआरडीएच्या अनेक कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव घरी पाठवण्यात आलं.

या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पथकाने युद्धपातळीवर तपास केल्यानंतर परिसरात कोणताही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. फोनवरून मिळालेली माहिती खोटी असून अफवा पसरल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. दरम्यान, बॉम्बची माहिती दिलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

 

Tags

follow us