मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईमधील विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणारंय. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिक-ठिकाणी नाकाबंदी केली जाणारंय. याशिवाय वाहतुकीत देखील काही बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंध असणार आहे.
बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळं सव्वा चार ते साडे पाच या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) तसेच 5.30 ते 5.45 या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडं) वाहतूक संथ गतीनं सुरु असणारंय.
मुंबईतील वाहतुकीतीबाबत वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरुन वेळोवेळी माहिती मिळणारंय. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए मैदान आणि मेट्रो सात मार्गिका गुंदवली आणि मोगरापाडा स्थानकादरम्यान ड्रोन, पॅरागलाईडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास बंदी घालण्यात आलीय. मोदींच्या दौर्याच्या दिवशी आज गुरुवारी हे क्षेत्र उड्डाण प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय.
मुंबई वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमिली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी राहणार आहे.
संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाता येणार नाही. खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाता येणार नाही.
सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलींकच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेश बंदी असणार आहे. संपूर्ण बीकेसी परिसरात रस्त्यांवर पार्किंगला बंदी असणारंय.