भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक

मुंबई : राज्यात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राजकीय आरोप – प्रत्यारोप होऊ लागले आहे. यातच भाजपकडून आंदोलने देखील करण्यात येत आहे. भाजपच्या या आंदोलनाचा राष्ट्रवादीने चांगलंच समाचार घेतला आहे. ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहित नाही… अजित पवार काय म्हणाले हे माहीत नाही… आपण कशासाठी आंदोलन करत आहोत हे माहीत […]

Tapase

Tapase

मुंबई : राज्यात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राजकीय आरोप – प्रत्यारोप होऊ लागले आहे. यातच भाजपकडून आंदोलने देखील करण्यात येत आहे. भाजपच्या या आंदोलनाचा राष्ट्रवादीने चांगलंच समाचार घेतला आहे.

ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहित नाही… अजित पवार काय म्हणाले हे माहीत नाही… आपण कशासाठी आंदोलन करत आहोत हे माहीत नाही, त्यावरून भाजपचे आंदोलन म्हणजे फक्त धुळफेक आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

तपासे पुढे म्हणाले, अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्य रक्षक’ म्हणून संबोधल्यानंतर भाजपने गळा काढायला सुरुवात केली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करताना हेच भाजपचे चेलेचपाटे कुठे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची वक्तव्ये भाजप मंत्री करत असताना हेच भाजपचे नेते फक्त बघ्याच्या भूमिकेत होते. आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटले नाही म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र त्यांचा हा दोगलेपणा आजच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून समोर आला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

Exit mobile version