Download App

राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमोल येडगे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

IAS Officers Transfers : आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 IAS आणि 44 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधक प्रशिक्षण आणि परिषदेचे संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर या पदावरील अमोल येडगे यांना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे.

राहुल रेखावार हे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असताना अनेकवेळा चर्चेत आले होते. अंबाबाई मंदिरात पत्रकारांचा प्रवेश रोखणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवाला तत्काळ हटवणे आदी विषयांवर चांगलेच चर्चेत आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी त्यांना हटवण्याची मागणी अनेकवेळा केली होती. गेल्यावर्षी पूर आल्यास लोकांना आपत्तीला सामोरे जावे लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यानंतर अनेकांनी स्थलांतर केले होते. त्यामुळे भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते. अशा वादग्रस्त भूमिकांमुळे राहुल रेखावार चर्चेत राहिले होते.

17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

1. नितीन पाटील – विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई, यांची सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. अभय महाजन – सचिव, अपंग कल्याण विभाग, यांची विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. संजय एल. यादव – व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. राहुल रेखावार – जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. राजेंद्र क्षीरसागर- जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची मुंबई उपनगर जिल्हा, जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. अमोल येडगे – संचालक, महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे, यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. मनुज जिंदाल – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. भाग्यश्री विसपुते – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपती संभाजी नगर
9. अवशांत पांडा – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. वैभव वाघमारे – प्रकल्प अधिकारी, ITDP, अहेरी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली, यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
11. संजीता महापात्रा – प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. मंदार पत्की – प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार, यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
13. मकरंद देशमुख- सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
14. नतिशा माथूर – कॅडर गुजरात यांची महाराष्ट्रात प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार म्हणून बदली करण्यात आली आहे.
15. मानसी – सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली.
16. पुलकित सिंग – सहायक जिल्हाधिकारी, चांदवड उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकल्प अधिकारी, ITDP, कळवण आणि सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभाग, नाशिक
17. करिश्मा नायर – सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभाग, बीड यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, जवाहर आणि सहायक जिल्हाधिकारी, जवाहर उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

follow us