Tukaram mundhe Action on Blood Centres : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Ttukaram mundhe) यांनी मेडिकल, दूधभेसळीनंतर रक्तकेंद्र (Blood Centres) आणि रक्त साठवणूक केंद्रांवरही (Blood Storage Centres) कारवाई केली आहे. गेल्या तीन महिन्या 23 रक्तकेंद्र व 15 रक्त साठवणूक केंद्रावर एफडीएने कारवाई केली आहे. त्यातील 21 रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. तर दोन परवाने रद्द करण्यात आली आहे.
औषधे व प्रसाधने अधिनियमानुसार रक्तकेंद्र व रक्त साठवणूक केंद्रांना परवाना घेणे बंधनकारक आहेत. रक्त संकलन, रक्ताची तपासणी, रक्तघटकांचे विभाजन, साठवणूक, तापमान नियंत्रण, गुणवत्ता नियंत्रण, प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणांची उपलब्धता, अभिलेखांचे व्यवस्थापन आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन यांसह सर्व बाबींसाठी कठोर निकष निर्धारित करण्यात आले आहेत. या निकषांचे पालन होत नसल्याचे एफडीएच्या तपासणीत उघडकीस आले आहे. तीन महिन्याच्या कारवाईत 21 रक्तकेंद्र आणि 13 रक्त साठवणूक केंद्राचे परवाने निलंबित केले आहे. तर दोन्ही मिळून चार परवाने रद्द केले आहेत.
भारताच्या प्रगतीसाठी संशोधनावर लक्ष; पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील यांचं प्रतिपादन
कारवाई केलेले रक्तकेंद्राचे नावे
श्री बालाजी रक्तकेंद्र, अमरावती, श्री गजानन रक्तकेंद्र-वाशिम, संकल्प रक्तकेंद्र-कल्याण, जिल्हा रुग्णालय औंध, पुणे-मेट्रो रक्त केंद्र-सांगवी, पुणे, काई मधुकर बिडकर रक्त केंद्र पुणे, वेद मेडिकल फाउंडेशन विटा, सांगली, वंसतदादा पाटील रक्त केंद्र आणि रक्तविज्ञान संशोधन केंद्र-मिरज सांगली, छत्रपत्री शाहू महाराज प्रतिष्ठानच्या शाश्वत रक्त केंद्र- मिरज, डॉ. पी. टी. शहा अध्यक्ष इस्लामपूर मेडिकल फाउंडेशन, राजारामबापू रक्त केंद्र-इस्लामपूर-सांगली.
आझाद पंची ग्रुपचे मिरज सिरिओलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर, सांगली. प्रकाश हॉस्टिपटल आणि रिसर्च सेंटर-इस्लामपूर, मिरज सिरिओलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक, हिंदरत्न प्रकाशबापू पाटील रक्क केंद्र-सांगली, इंडियन रेड क्रॉस सोसायटी डॉ. शिरगावकर रक्त केंद्रसमो-सांगली. डॉ. डी. के. गोसावी मेमोरियल, श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्टिपल, श्रीमती अनिल कटिलाल कोठारी रक्त केंद्र, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, ब्लड सेंटरसांगली. श्री बसवेश्वर मानव विकास ग्रामीण सेवाभाव संस्था, आयुष रक्त केंद्र-वडूज, सांगली, ओम रक्त केंद्र शिरुर, पूना सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक रास्ता पेठ, पुणे यांचे परवाने निलंबित केले आहे.
क्रिकेटच्या पंढरीत भारताच्या पोरींची कमाल; लॉर्ड्सवर जिंकला पहिला महिला कसोटी सामना
या ब्लड साठवणूक केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द
तपासणीवेळी गंभीर उल्लंघन आढळून आलेल्या बोरी पारधी पुणे येथील पाटील हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर, भिवंडीतील आधार ब्लड स्टोरेज सेंटर ट्रस्टचे रक्त साठवणूक केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
सर जे. जे. महानगर रक्तकेंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द
जून महिन्यात दोन रक्तकेंद्रांबाबत एफडीएकडे तक्रारी आल्या होत्या. या तपासणीमध्ये दोन रक्तकेंद्रामध्ये गंभीर उल्लंघने आढळून आली आहेत. मुंबईतील सर जे. जे. महानगर रक्तकेंद्र आणि ठाण्यातील बदलापूर येथील माया ब्लड सेंटरचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
केवळ व्यावसायिक हितासाठी रक्तकेंद्र संचालित करणाऱ्या व नियमभंग करणाऱ्या रक्तकेंद्र व रक्त साठवणूक केंद्रावर सातत्याने देखरेख ठेवून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कटिबद्ध असल्याचे तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
