Uddhav Thackeray Press Conference : देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी परराज्यात आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, ते त्या ठिकाणी कोणत्या भाषेत बोलणार याची उत्सुकता आणि चिंता उद्धव ठाकरेंना पडली आहे. मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून इतरांच्या घरात डोकावत असल्याची टीकाही यावेळी ठाकरेंनी केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
थेट काढली लाज
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांची उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं सोडून स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले आहेत. शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढावलेले असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज कशी नाही वाटत, असा घणाघात ठाकरेंनी शिंदेवर केला.
Sanjay Raut : ‘तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर’.. राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल
एक फुल दोन हाफ म्हणत केली टीका
शिंदेंच्या तेलंगणा दौऱ्यावर बोचरी टीका करताना ठाकरेंनी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरही टीकेची तोफ डागली. यावेळी या तिघांचा त्यांनी एक फुल दोन हाफ असा उल्लेख केला. मधल्या काळात दुसरे हाफ छत्तीसगढला प्रचाराला गेले होते. तर, दुसऱ्या हाफला डेंग्यू झाला होता, ते कुठे आहेत त्याबद्दल माहिती नाही. त्यामुळे राज्याचा मायबाप नेमका कोण?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
“ओबीसींच्या लढ्याचा जनक अन् भुजबळांना जेलमधून बाहेर काढणारा मीच”
अवकाळीचा इशाऱ्यानंतरही सरकार ढिम्म
राज्यातील विविध भागात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे एकीकडे शेतकरी राजा हवालदील झाला असून, हवामान खात्यानं अवकाळी पाऊस पडेल असा इशारा दिला होता मग सरकारनं काय केलं? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित करत इशाऱ्यानंतरही हे सरकार ढिम्म बसून राहिले आहे.