Ashish Shelar Attack On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी काल (दि. 6) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेली ‘मस्टर मंत्री’ ही टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. ठाकरेंच्या या टीकेला भाजपच्या नेत्यांकडून प्रतिउत्तर दिले जात असतानाच भाजप नेते आशिष शेलारांनी थेट ठाकरेंच्या छातडावर नाचण्याचा इतिहास काढला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शेलारांना मुंबईसाठी आम्ही काय केलं तुम्ही कोण? आमचे मामा की काका? असा प्रश्नदेखील विचारला आहे.
आमचा पक्ष अन् परिवार व्यवस्थित, जयंत पाटलांबद्दल सांगायला मी मनकवडा नाही; अजितदादांची चौफेर फटकेबाजी
काल ठाकरेंनी भाजपच्या छाताडावर बसून भगवा फडकवायचा असल्याचे विधान केले होते. यावर बोलताना शेलार म्हणाले की, व्यतिगत टीका करणं हे भाजपचं काम नाही. पण, गेल्या १५ वर्षातील उद्धव ठाकरेंची भाषणं काढली तर, यांच्या छाताडावर नाचू, कधी त्यांच्या छाताडावर नाचू हाच ठाकरेंच्या भाषणातील गाभा राहिला आहे. पण, त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या छाताडावर नाचू त्यांच्या सगळ्यांच्या चरणांशी नतमस्तक काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर ठाकरेच गेल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले.
ज्या नेत्याला स्वाभिमान नाही. सत्तेसाठी विश्वासघातकी करण्याचा ज्याचा स्वभाव आहे अशा नेत्यांच्या पंक्तीत अग्रणी नाव उद्धव ठाकरे यांचे असल्याची टीकाही शेलारांनी यावेळी बोलताना केली. छाती, छाताड, स्वाभीमान यापेक्षा सत्तेच्या गिधाडाची वृत्ती उबाठाच्या शिवसेनेची आहे. शेलारांच्या या टीकेमुळे भाजप आणि ठाकरे गटातील वाद अधिक शिगेला पोहचण्याची शक्यता आहे.
बोलताना काळजी घ्या! फडणवीसांनी धाडला संभाजी भिडेंना निरोप? माजी आमदार बनला दूत
स्वत: केवळ घरात बसून राहिले त्यांना परफॉर्मर नेत्यांची माहिती काय असणार? असे म्हणत उद्धव ठाकरे यांची घरबशा मुख्यमंत्री अशी ओळख असल्याचे ते म्हणाले. दगाबाजी करणाऱ्या नेत्यांच्या यादीत ठाकरेंचा समावेश असल्याचे म्हणत घरबशा नेत्यांनं फडणवीसांवर टीका करु नये. तसेच दुसऱ्या पक्षात डोकावु नये असा सल्लादेखील शेलारांनी यावेळी ठाकरेंना दिला. देवेंद्र फडणवीस यांची ओळख ही परफॉर्मर मंत्री अशी झाली आहे. दुसऱ्यांच्या घरात डोकावुन बघण्याचा चोंबडेपणा उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित नाही.
चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…
सगळा हिशोब देऊच
अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती! म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले? आज मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना…त्यांनी साठ वर्षात काय केले? तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा? आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे…त्यांना सगळा हिशेब देऊच! तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका? तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका!! असे ट्विटही शेलारांनी केले आहे.
अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती!
म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले?
आज मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना…
त्यांनी साठ वर्षात काय केले?…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 6, 2023
भाजप नेत्यांची फडणवीसांसाठी बॅटिंग
ठाकरेंच्या मस्टर मंत्री टीकेवरून एकीकडे नव्या वादाला तोंड फुटलेले असताना दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी फडणवीसांसाठी मैदानात उतरून बॅटिंग करण्यास सुरूवात केली आहे. फडणवीस मस्टर नव्हे तर मास्टर मंत्री असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्याच मास्टर स्ट्रोकमुळे तुम्हाला घरी बसावं लागलं, असा हल्लाबोलही बावनकुळेंनी केला आहे.
…तर कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होवो; CM पदासाठी पाटोलेंचे ‘भद्रा मारुती’ कडे साकडे
उद्धव ठाकरे यांनी स्वत:ची परिस्थिती पहावी.
तर, आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तप देताना म्हटले आहे की, मागच्या दीडवर्षापूर्वी मस्टर ठेवलं असतं तर, आज उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती.देवेंद्र फडणवीसयांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस हे देशाचे मास्टर मंत्री आहेत. संपूर्ण देशाला देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व माहित असून, उद्धव ठाकरेंनी लायकी ठेवून बोलावं. ज्या औरंगजेबाबद्दल बोलत आहात तो औरंगजेब तुम्ही असल्याचेही लाड यांनी म्हटले आहे.