Download App

‘वर्षा’तील गंडेदोरे आणि लिंबू फेकाफेकी : नितेश राणे काय बोलले?

Nitesh Rane on Sanjay Raut and Uddhav Thackeray : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा सन्मान एका देशाच्या पंतप्रधानांनी केला. पण पाकिस्तानच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या टोळीला आमच्या पंतप्रधानांचा मान कधीही दिसणार नाही. म्हणून तो देश जादुटोणा करतो, छूमंतरचा देश आहे, भूतप्रेत आहेत. पण सर्वात मोठा जादुटोणा करणारा, छूमंतर करणारा हा तुझा मालक आहे, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे.

नितेश राणे पुढं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी काळी विद्या करुन काय काय मिळवलं आयुष्यात, कोणाकोणाला पोहचवलं यांची उदाहरणं आमच्याकडे आहेत. दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांच्या काळ्या जादूवर बोलण्याअगोदर संजय राऊतांनी तुझा मालक किती गंडे घालतो? किती लिंबू कापतो? घरात काय काय आणून ठेवले आहे? कर्जतच्या फार्म हाऊसवर किती नरबळी आणून ठेवलेत याची थोडी माहिती घे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

राम शिंदे यांच्याकडून रडीचा डाव; रोहित पवारांचा थेट आरोप

जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी वर्षा बंगल्यावर राहायला जाण्याअगोदर वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूच्या लॉनवर जेसीबी कोणी आणले? जेसीबी आणून तिथं खोदायला लावलं. त्या जमीन किती लिंबू टाकलेलं? अजून काय काय टाकलेलं? या गोष्टींबद्दल माहिती देऊ? कोणता कोणता बुवा, जादूटोणा करणारे लोकांना उद्धव ठाकरेंनी काय काय करायला लावलेलं आहे? मोहिनी मंत्र वगैरे उद्योग केलेत, अशी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

Trimbakeshwar Temple : 100 वर्षांची धूप दाखवण्याची परंपरा दाखवाच, तुषार भोसलेंचं संजय राऊतांना खुलं चॅलेंज

उद्धव ठाकरेंच्या हातांनी लोकं खात नव्हते म्हणून जेवणात टाकून द्यायचे. घराच्याबाहेर आणून टाकायचे. त्यांचे सर्व उद्योग आम्हाला माहिती आहेत, असे नितेश राणे म्हणाले. ते पुढं म्हणाले की उद्धव ठाकरे पत्नीसह एका बुवाकडे गेले होते. त्या बुवांनी सांगितलं की तुमचा मुख्यमंत्री होण्याचा योग नाही. तुम्ही मुख्यमंत्री होणार नाहीत पण तुमच्या पत्नी मुख्यमंत्री होतील. यावर उद्धव ठाकरे लगेच तयार झाले आणि मी राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवणार अशी घोषणा करुन टाकली. म्हणजे पहिल्या मुख्यमंत्री कोण तर रश्मी ठाकरे. हे खरं आहे खोटं हे त्यांनी सांगावं, असे आव्हान नितेश राणे यांनी संजय राऊत दिले आहे.

Tags

follow us