Download App

संजय राऊत हे काय बोलले?; राज ठाकरेंशी इमोशनल अटॅचमेंट!

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Raj Thackeray Friendship : अजित पवाराच्या शिंदे-भाजपच्या सोबतीनंतर आता ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबाबतचे पोस्टरही राज्यातील विविध भागात लावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंबाबत मोठे विधान करत राज ठाकरेंशी इमोशनल अटॅचमेंट असल्याचे म्हटले आहे.

NCP Political Crisis : …म्हणून शरद पवारांचा धुळे-जळगाव जिल्हा दौरा झाला रद्द

ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चांवर राऊतांनी भाष्य केले असून, ते म्हणाले की, राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोघे भाऊच आहेत. तसेच, राज ठाकरेंसोबत माझी मैत्रीही सर्वांना माहिती आहे. काळाच्या ओघात आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले. मी आमच्या पक्षाची भूमिका मांडत आहे त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने काम करतो.

आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची, कोणत्याही नाटकाची गरज नाही. उद्धव आणि राज ठाकरे हे भाऊ आहे. एक कुटुंब आहे. एक फोन उचलायचा आणि एकमेकांशी बोलायचं कोणी येऊन नोटंकी करण्याची गरज नाही. या ज्या चर्चा झाल्या या संदर्भात आम्ही सविस्तर बोललो असेही राऊतांनी म्हटले आहे.

आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

कोणताही प्रस्ताव नाही 

मनसे नेते अभिजीत पाटील यांनी काल (दि.6) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतल्याने या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या चर्चा खऱ्या नाहीत. ठाकरे गटाकडे असा कोणताच प्रस्ताव ठेवला नसल्याचे खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीच स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, असे राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनीही मनसेकडून असा कोणताच प्रस्ताव मिळाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे ठाकरे आणि मनसे युतीच्या फक्त चर्चाच होत्या हे आता स्पष्ट झाले आहे.

आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

नेमकं काय घडलं?

मनसे नेते यांनी आज खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर राऊत लगेचच उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी तर दुसरीकडे पानसे राज ठाकरेंच्या निवासस्थानाकडे निघून गेले. या घडामोडींनंतर मनसेने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पानसे यांनी राऊतांची भेट घेतली त्यावेळी दोघांत पंधरा मिनिटे चर्चा झाली. याआधी भांडूप ते सामना कार्यालयापर्यंत एकत्र कारने त्यांनी जवळपास सव्वा तास प्रवास केला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या दोघांत काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

मी कोणताच प्रस्ताव दिला नाही – पानसे 

दरम्यान, स्वतः पानसे यांनीही याबाबत खुलासा केला आहे. मी संजय राऊत यांना युतीचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मी लहान माणूस आहे. राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यायचे की नाही याचा निर्णय दोघांनीच घ्यायचा आहे. संजय राऊत आणि माझी जुनी ओळख आहे. अनेक दिवसांपासून त्यांची भेट झाली नव्हती. म्हणून त्यांना भेटलो असे पानसे म्हणाले.

आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

Tags

follow us