NCP Political Crisis : …म्हणून शरद पवारांचा धुळे-जळगाव जिल्हा दौरा झाला रद्द

NCP Political Crisis : …म्हणून शरद पवारांचा धुळे-जळगाव जिल्हा दौरा झाला रद्द

Sharad Pawar : राज्यात राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवारांच्या बंडामुळे उभा फुट पडली आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशीपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा करण्याचे जाहिर केले आहे. त्यानुसार शरद पवार पहिल्यांदा नाशिकच्या येवल्यामध्ये पहिली सभा घेणार आहेत. मात्र त्यानंतर होणारा त्यांचा धुळे आणि जळगाव जिल्हा दौरा हा रद्द करण्यात आला आहे. ( Sharad Pawar Dhule Jalgaon tour canceled Due to Rainy season )

Rahul Gandhi Defamation Case : गुजरात उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना झटका, याचिका फेटाळली

येवल्यानंतर लगेचच शरद पवार धुळे आणि जळगाव जिल्हा दौरा करणार होते. मात्र सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. असं हा दौरा रद्द होण्यामागचं कारण सांगण्यात येत आहे. त्यामुळे पवार हे येवल्याची सभा झाल्यानंतर ते मुंबईला परत जाणार आहेत. असं सांगण्यात येत आहे.

आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

यानंतर 8 तारखेपासून शरद पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात पवार उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातून करणार आहेत. 8 जुलैला पवार नाशिकमध्ये जाणार आहेत. तर 9 जुलैला धुळे आणि 10 जुलैला जळगावला जाणार होते. मात्र आता त्यांचा दौरा पावसाळी वातावरणामुळे हा रद्द करण्यात आला आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी कराडमध्ये जाऊन प्रितीसंगम येथे दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. राष्ट्रवादीत जे काही झाले त्यासंदर्भात पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात जाणार आहे, आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगत येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील चित्र पालटलेले असेल असे सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube