मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उद्या मालेगावात (Malegaon) जाहीर सभा होते आहे. खेडमध्ये झालेल्या विराट सभेसाठी मुस्लीम समजाने सभेला उपस्थित राहावे असे आवाहन करणारे पत्रक प्रसिद्ध केले होते. त्याविषयी चर्चा होत असताना मुस्लीम बहुल मालेगाव शहरात उद्धव ठाकरेंची रविवारी सभा होत आहे. त्यामध्ये सभेच्या जाहिरातीचा बॅनर उर्दूत (Urdu banner) लागला आहे.
उद्धव ठाकरेंच्या या सभेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मालेगाव ग्रामीण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. दादा भुसेंच्या बंडाला प्रत्युत्तर म्हणून ही सभा मालेगावात होते आहे.
दादा भुसेंच्या मालेगावात सभा होत असली तरी धुळे, जळगाव, मालेगाव आणि नाशिक ग्रामीण भागात शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्याच्या सभेतून काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
सभेची जाहिरात चक्क उर्दू भाषेत करण्यात आली
शिवसेनेकडून मराठीसोबत उर्दू भाषेत सभेची जाहिराती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आता याच मुद्द्यावर भाजप आणि उद्धव ठाकरे गटात वाद रंगला आहे. भाजपकडून उर्दू मधील जाहिराती वरून उद्धव ठाकरे याना लक्ष केल जातंय.
कर्जतचे राजकारण तापले : राम शिंदे यांची बैठक तर अजितदादा दौऱ्यावर
या बॅनरवर छत्रपति शिवाजी महाराज, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. या बॅनरवरील मजकूर भगव्या रंगात लिहिण्यात आला आहे. या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी “आता तुम्हीच पाहा हिंदुत्व कुठे गेलंय? असा प्रतिप्रश्न पत्रकारांना विचारला. शिंदे म्हणाले, “बाळासाहेब असते तर हे खपवून घेतलं असतं का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव बाळासाहेव ठाकरे यांचे समर्थक म्हणताय उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सर्वमान्य होताय. तर शिंदे गट म्हणतोय हिंदुत्व कुठे गेलंय? एकूणच काय या आगळ्यावेगळ्या बॅनरची चर्चा तर होणारच.