कर्जतचे राजकारण तापले : राम शिंदे यांची बैठक तर अजितदादा दौऱ्यावर

कर्जतचे राजकारण तापले : राम शिंदे यांची बैठक तर अजितदादा दौऱ्यावर

अहमदनगर : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची (Market Committees)मतदार यादी (Votting List)तयार झाली आहे. या बाजार समितीत केव्हाही निवडणूक कार्यक्रम लागू होऊ शकतो. अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँकेपाठोपाठ (ADCC Bank)कर्जत व जामखेड तालुक्यातील बाजार समितीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखण्यासाठी उद्या रविवारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. उद्याच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारही (Ajit Pawar)कर्जत- जामखेड (Karjat-Jamkhed) दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे कर्जत-जामखेडचे राजकीय वातावरण (political climate)कमालीचे तापले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 14 तालुके आहेत त्या सर्व तालुक्यांतील बाजार समित्यांच्या मतदार यादी कार्यक्रम पूर्ण झाला आहे त्यामुळे बाजार समित्यांसाठी केव्हाही सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्ष आपापले पॅनल तयार करण्यात व्यस्त आहेत.

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये स्वीटीची सुवर्ण कामगिरी

राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त बाजार समिती मध्ये भाजपची सत्ता यावी यासाठीच्या हालचाली भाजप कडून आता सुरू झाले आहेत. कर्जत व जामखेड बाजार समितीची जबाबदारी आमदार राम शिंदे यांच्यावर आहे. त्या दृष्टीने त्यांनी उद्या रविवारी चौंडी येथील त्यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांची विशेष बैठक आयोजित केली आहे.

बाजार समित्यांत प्रत्येकी 18 संचालक आहेत. त्यामुळे भाजपकडून आरक्षणासह पॅनल तयार करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. उद्या भाजप कडून कर्जत व जामखेड बाजार समितीचा पॅनल निश्चित करण्याची शक्यता आहे.

भाजप कडून बाजार समिती निवडणुकीची तयारी सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी कर्जत मध्ये बारामती ॲग्रो लिमिटेड व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेतर्फे दहा हजार गरजूंना सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम उद्या रविवारी आयोजित केला आहे.

हा सायकल वाटपाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवारांचा हा दौरा बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारा ठरेल असे बोलले जाते. मात्र या दोन्ही कार्यक्रमांमुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube